५४ आत्मविचार. स० सर्व दुःखाचे बीज देहाभिमान आहे, मणने यावद्देहेंद्रियप्राणैरात्मनःसन्निकर्षणं । संसारः फलवांस्तावदपार्थोप्यविवेकिनः ॥ देहेंद्रियें, मन प्राणादिक् आत्म्याहून भिन्न मिथ्या असतां अविवेकाने जड, वेतन ऐक्यत्वे, सर्व सत्य जाणून मी कर्ता, भोक्ता, हाच अध्यास बाधक असून हेच आत्मत्वी आवरण आहे. ते अहंकारावरण दूर करण्याची सर्व साधने होत ज्याप्रमाणे · इक्षौ गुडस्तिले तैलं काष्ठे वन्हिषद्ययः । धेनावाज्यं वपुष्यात्मा लभंते नाप्रयत्नतः॥ उसांत गूळ, तिळांत तेल, काष्ठांत अग्नी, पृथ्वीत जल, गो अना स्तनी दुग्य, पुष्पांत गंध, दुधांत घृत असतांही क्रियेविना प्राप्ती नाही; किंवा चिंतामणी असून परिक्षा नसल्यास दरिद्र दूर होत नाहीं; अथवा गाईस काही व्रण झाले त्यास गाईचें घृत उपचार आहे; तेथे गाईचे घृत गाई- तच आहे असें मटल्याने ते दुःख दूर होत नाही. तर घृत गाईडून पृथक काढूनच उपचार केला पाहिजे तद्वत् एवं सर्वशरीरस्थः सर्वित् परमेश्वरः । विना चोपासनां देवो न करोति हितं नृषु ॥ सर्वीचे अंतर्यामी आत्मा दुग्धांत घृतवत् पूर्ण आहे; तथापि देह तादात्में अज्ञानाच्छादित ह्मणून मोक्षार्थ निरुपयोग यास्तव जड व चेतन पृथक करण्यास साधनापेक्षा माहे, आणि स्थावरादिक जडांत उपाधिभेदें अव- स्तेचा भेद आहे ह्मणजे सर्व सृष्टी वासनेमुळे आहे. यांत घन वासना ती केवळ जड सुप्तवत् होत. जसें मुप्तास काहीच कळत नाही तसें स्थावर
पान:आत्मविचार.djvu/७४
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही