या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दृष्टा जन्मजराविपत्ति मरणं त्रासश्च नोत्पद्यते पीत्वा मोहमयींप्रमादमदिरासुन्मत्तभूतं जगत्॥ सूर्यास्तोदयीं, अपाले आयुष्य धर्म धन, नष्ट, होत असून अनेक प्रकारचे कारभारांत कालगती लक्षीत नाही आणि आपणास व इतरांस जन्म, जरा, मृत्यु, विपत्ती अनंत क्लेश सतत् अनुभवी येतात तरी विरक्ति येत नसून जसा मद्यपी उत्तम असतो तद्वत् मोहप्रमादाने सकलविश्व उत्तम वेफाम झाले आहे याचा शेवट पश्चात्ताप होतो व कृतकर्माचे फल बिन- चुक भोगावे लागते. या प्रारब्धानुरूप सुखदुःख भोगण्याचे सर्वथैव साधन हे मनुष्यशरीर आहे ते अनेकजन्मान्ती महत्पुण्योदयानें क्वचित् प्राप्त होत असते. जशा अनेक वस्तू प्रयत्नाने मिळतात तसा चिंतामणी मिळत नसतो, किंवा सहज जांभई घेताना तोंड वासले असतां अकस्मात् पूर्वसुकृतें मुखांत अमृत पडावें तद्वत् महद्भाग्याने या मनुष्यदेहाचा लाभ होत असतो यायोगें सत्यासत्य विचार करून कृतार्थ होणे हे या देहाचे कर्तव्यकर्म होय. या देहयोगें बंध मोक्ष जें इच्छावें तें घडते याच कारणी याम आद्यदेह खटला असून देव पण या देहाची इच्छा करतात. असें दुर्लभ शरीर प्राप्त झाले असून पश्वादिकांचे विषयादिक तुच्छ धर्म स्वीकारून जे पुरूष ईश्वरभक्ति विन्मुख होतात ते परमेश्वराचे विश्वासघातकी,कृतघ्न,आत्महत्यारे शेवटीं अतिखेद पावतात. जसा- चिंतामणि देहमुपेत्य मानुषं सर्वार्थदं भोगविषक्तमानसः पुत्राधनार्थमथोत्सृजत्यहो तापं तु पश्चात्कृषिको यथाश्नुते ॥