पान:आदयशास्त्रकथन.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

क) स्वभाव पापी झाला आणि तसल्या दुष्टस्वभावामुळे प- वित्र देवाचें भजनादिक त्यांला बरें वाटेनासें झालें आणि थोडक्याच वर्षांपुढें देवाचें भय टाकून बहुत मनुष्यें स्वे- च्छेने अमंगल कर्मे करूं लागलीं पण त्यांत कित्येकानी पहिल्यापासून देवास भिऊन त्याच्या आज्ञा पाळून ये- णाऱ्या तारणारावर विश्वास ठेविला ते अद्यापि पापाचा पश्चात्ताप करून वाईट कामें सोडून निराकार देवालाच भजतात सुणोन ते देवाला प्रिय आहेत तो त्यांच्या पा- पाची क्षमा करून त्यांस तारितो. धडा ४. जलप्रलयाविषयींची गोष्ट. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून सोळाशे वर्षातच मनुष्यां- चा बुद्धिभ्रंश होऊन धर्मक्षय होऊं लागला तेव्हां मनुष्यां- च्या कल्पना व अंतःकरणांतील वृत्ति उत्तरोत्तर वाईट असें पाहून देव ह्मणाला ज्या मनुष्यांला म्यां उत्पन्न केलें आहे त्यांला व त्यांजबरोबर जनावरें व सर्पटत चालणारे प्राणी व आकाशांत उडणारे पक्षी या सर्वास पृथ्वीवरून नाहींसें