पान:आदयशास्त्रकथन.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १२ ) या कुटुंबांतील तुकड्यानी देशोदेशीं जाऊन राहून ट थ्वीभर पसरावें ह्मणोन देवाने त्यांची भाषा भिन्न भिन्न केली नंतर त्या तुकड्या पृथ्वीभर पसरल्या तेव्हां ज्या देशीं हवा थंड होती तेथें राहणारे लोक गोरे झाले आणि ज्या देशीं हवा उष्ण होती तेथले लोक काळे झाले असे नोहाच्या कुटुंबापासून सर्व लोक जगांत उत्पन्न झाले जो पर्यंत मनुष्ये थोडीं होतीं तोंपर्यंत तीं बहुत वर्षे वांचत पण जेव्हां संतति वाढून पाप फार वाढूं लागलें तेव्हांपा सून देवाने त्यांचें आयुष्य कमी केलें पूर्वी लोकानी आ- पल्या पापामुळे जलप्रलय होऊन आपला नाश झाला असें मनांत धरून कांहीं वेळपर्यंत देवाचें भय बाळगून त्याच्या आज्ञा पाळिल्या परंतु मनुष्यांची बुद्धि मुळापा सून दुष्टच सणोन निराकार व पवित्र जो भगवान त्या चें भजन व त्याची सेवा करण्याविषयीं त्यांस कंटाळा ये- ऊन कोणी देवाला सोडून नास्तिकपण धरूं लागले कोणी देवाविषयीं अज्ञानी होऊन सूर्य चंद्र इत्यादिकांचें भजन करूं लागले आणि कित्येक लोकांमध्ये जे कोणी राजे झा ले होते व ज्यांच्या हातून अचाट कर्मे घडलीं ते देवाचेच अवतार आणि मेल्यावरहि ते देवच होतात असें न ते लोक त्यांचें भजन करण्याकरितां त्यांच्या मूर्ति घ डून स्थापून त्यांची पूजा करूं लागले. कल्पू याप्रमाणें देवाची भक्ति सोडून लोक पापामध्ये अ- डकले