पान:आदयशास्त्रकथन.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२) हूं तें ऐकून लाबान व बथुवेल बोलले जें ईश्वराने घड विलें तें आह्मास मान्य आहे ही रिब्का जवळच आहे घेऊन जा आणि ही ईश्वरसंकेताप्रमाणें तुझ्या धन्या- च्या पुत्राची बायको होवो असें त्याचें वचन घेतल्या- वर भूमीकडे नमन करून त्याने ईश्वराचें भजन के लें आणि लागलींच वस्त्रे भूषणें काढून रिब्केला देऊ- न तिच्या भावास व तिच्या आईसहि उंच उंच वस्तू दिल्या आणि सर्वानी जेवण खाण करून रात्रीची रात्र तेथें राहून सकाळीं रिब्केला मजबराबर पाठवा असें तो कारभारी बोलूं लागला तेव्हां तिचा भाऊ व तिची आई बोलिली अणखीं दहा दिवस रिब्केला येथें राहूं- द्या तो बोलला ईश्वराने माझें काम लवकर सफळ के- लें यास्तव तुझी मला खोळंबूं नका लवकर मी आप- ल्या धन्याजवळ जाणार असी त्यान्ची निकड पाहून ति च्या भावाने व आईने रिब्केला बोलावून समक्ष विचारि- लें रिब्के तूं ह्या माणसाबरोबर जातेस ती बोलिली हो मी जाईन तेव्हां त्यानी दाई इत्यादिकांला बरोबर देऊन रिब्केला त्याचे संगतीं रवाना केलें त्यावेळीं त्यानी रिब्के ला कन्यापुत्ररूप संतति तुझी पुष्कळ वाढून तूं आपल्या वैय्यांच्या दरवाजाचें वतन पाव असा आशीर्वाद दिला तो घेऊन रिब्का आपल्या बरोबरच्यांसुद्धां त्या कारभा- याबरोबर निघाली ती इझाकाच्या गांवाजवळ पोहोच ली