पान:आदयशास्त्रकथन.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३५) पूर्वी देवाने आब्राहामाला सांगितलें होतें किं मी तुझी संतति फार वाढवीन ह्मणोन जरी मिसरदेशांत इस्राएललोक दुःख पावूं लागले तरी ते देवाच्या कृपे- ने वाढतच गेले हें पाहून राजाने इस्राएल लोकांच्या सर्व पोरांस जन्मतांच मारण्याची आज्ञा सुइणींस केली पण सुइणी देवाच्या भयाने हत्या करावयास नइच्छून राजाची आज्ञा मानीतना तेंव्हां इस्राएल लोकांतील ज- न्मलेल्या पोरांस नदीत टाकावें असी आज्ञा राजाने आ पल्या लोकांस केली तेव्हां इस्राएललोकांस परम सं कट प्राप्त होऊन ह्यांतून आपणास कसें तरी सोडीव अ- सी त्यानी देवाजवळ विनंती केली तेव्हां देवाने त्यांस सोडविणारा मोशे नामे आब्राहामाच्या वंशांत उत्पन्न केला त्याचा जन्म मिसरदेशांत पण तो प्रौढ झाल्या वर राजाच्या भयामुळें दुसरे देशांत पळून जाऊन रा हिला होता आणि चाळीस वर्षे गेल्यावर देवाने त्याला दर्शन देऊन कांहीं साक्षात्कार दाखवून इस्राएल लो- कांस संकटांतून काढावयास पाठविलें तेव्हां मोशे दे- वाच्या आज्ञेप्रमाणें मिसरदेशांत परतून आला आ णि आपला भाऊ अहरोन ह्यास घेऊन फारोराजा - वळ जाऊन बोलिला इस्राएल लोकांचा परमेश्वर तु- ला हाणतो किं माझा सण करायास माझ्या लोकांस रानांत जाऊं दे तेव्हां राजा ह्मणाला कोरचा परमेश्वर आणि