पान:आदयशास्त्रकथन.pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९५१) नशाउलराजा आपली फौज घेऊन शत्रूवर गेला ते- थें पराभव पावून लज्जेस्तव त्याने आपल्या हाताने आपला प्राण घेतला तेव्हां सर्व लोकानी दाविदाला गादीवर बसविलें. तो दाविदराजा धार्मिक देवाचा परम भक्त असून उपदेशकहि असे त्याने केलेल्या ईश्वरभ जन करण्याच्या गीत शास्त्रांत पुष्कळ आहेत त्या- जवर देवाची पूर्ण कृपा होती देवाने आशीर्वाद पूर्व- क त्यास सांगितलें किं तारणारा येणार आहे तो तु झ्या वंशांत होईल त्या तारणाऱ्याविषयीं दाविद राजा- ने बहुत भविष्य गोष्टी सांगितल्या त्या शास्त्रांत लि हिलेल्या आहेत दाविदराजा राज्य चालवीत असतां इस्राएल लोक सुखी होऊन फार वाढले असा बहु- तवर्षे राज्य करून तो मेला. दाविदाने आपल्या मरणानंतर आपला पुत्र शलमोन ह्यास आपल्या गादीवर बसवावा असा नेम केला होता तो शलमोन महा शहाणा फार वि द्वान् होता त्या देशांतील यरुशलेम नामें जी राज- धानी तेथें एक प्रसिद्ध डोंगर आहे त्या डोंगरावर दे वाच्या आज्ञेप्रमाणें त्याने एक मोठें शोभायमाम दे ऊळ बांधिलें त्या कामास दीड लक्ष माणसें नित्य वा- वरत असें असतां तें सिद्ध व्हायास सात वर्षे लाग- लीं