पान:आदयशास्त्रकथन.pdf/५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५५) बाकडे कां तुसी जातां मूर्तिपूजा कां करितां मूर्तिपू जक जे आहेत ते लांकडास किंवा दगडास माणसा- ची आकृति कोरून शोभेसाठीं त्यावर सोनें रूपें लावून ती मूर्ति देऊळांत स्थापितात तिच्या पायां- पडून प्रार्थना करून तूं आमचा देव आह्मास तार असें ह्मणतात जे तोंड असून बोलत नाहींत डोळे असून पाहत नाहींत कान असून ऐकत नाहींत नाक असून हुंगत नाहींत हात असून हालवीत नाहींत पाय असून चालत नाहींत ज्यांच्या भांत श्वासदेखील नाही ते तुमचें बरें किंवा वाईट काय करितील त्यांच्याने कांहीं करवत नाहीं तर तुह्मी तसल्या देवाला भजूं नका तुमचा देव तसला नव्हे सर्व सृष्टीची उत्पत्ति रक्षण पोषण करणारा असा असून निराकार देव आहे सर्वच शुभाशुभ पाह- तो प्रार्थना ऐकतो सर्वलोकांस ज्ञान बुद्धि शक्ति देतो असल्या देवाला सोडून मूर्तिभजन ह्मणजे अ गदीं व्यर्थ तें जर तुह्मी कराल तर तुमचा खचित नाश होईल. पण त्यांचीं तीं आचरण सुटलीं नाहींत शेवटीं त्यांजवर देवाची अवकृपा होऊन बाबेल देशचा न- बूखादनेज्जर ह्याने येऊन यरुशलेमबाहर घेतलें आणि राजास व थोर थोर लोकांस धरून आप- ल्या