पान:आदयशास्त्रकथन.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३)

त्यांला आशीर्वाद दिला किं तुह्मी सफल होऊन समुद्रांत वाढा आणि पांखरें पृथ्वीवर वाढोत तो सांज व सकाळ होऊन पांचवा दिवस समाप्त झाला मग देव बोलिला व- न्यपशु व ग्राम्यपशु आदिकरून सर्व जीवजंतूंला पृथ्वी उ- पजबो मग त्याप्रमाणें उपजल्यावर बरें आहे असें पाहो- नह्मणाला आली आपल्या प्रतिछायेप्रमाणें मनुष्यें उत्पन्न करूं तीं समुद्रांतील जलचरांवर पृथ्वींतील स्थलचरांवरच प- क्ष्यांवर पंनीपणा करोत असें बोलून देवाने मनुष्यें स्त्रीपु- रुषभेदाने उत्पन्न करून त्यांस तुझी सफल होऊन पृथ्वीभ वाढा आणि पृथ्वी व सर्व जीवजंतु यांवर धनीपणा करा असा आशीर्वाद दिला तो सांज व सकाळ होऊन सहावा दिवस समाप्त झाला याप्रकारें आकाश व पृथ्वी यांतील स- र्व वस्तु सहा दिवसांत सिद्ध करून सातव्या दिवसीं आप- ण विसांवा घेऊन देवाने ह्या दिवसाला आशीर्वाद देऊन ईश्वर भजनाकडे लाविला कांकिं या दिवसीं उत्पन्न करण्या- च्या कामापासून आपण विराम पावला

धडा २.

मनुष्यांची उसत्ति व स्थिति यांचें विशेष वर्णन.

    परमेश्वराने पृथ्वीवरच्या मातीपासून मनुष्य निर्माण