पान:आदयशास्त्रकथन.pdf/७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६९) धडा १७. इस्राएललोकांचा राजा एहाब ह्याला देवाने शाप दिला ह्याविषयीं गोष्ट जज रेलनगरांत एहाबराजाच्या वाड्यापासीं नाबो- थ ह्मणून एक माणूस असे त्याचा वडिलोपार्जित एक द्राक्षमंडप होता त्याला राजा एक दिवस बोलिला ना बोथा. तुझा द्राक्षमंडप मला दे तो माझ्या वाड्याजवळ आहे ह्मणून ती जागा परडें परसूं करायास मला सोई- ची आहे पाहिजे तर तुला त्या मंडपाबद्दल दुसरा त्या- पेक्षां कांहीं सरस मंडप देईन नाहीं तर त्याची रोख किंमत देईन तें ऐकून नाबोध ह्मणाला महाराज तें खरें पण माझ्या वाडवडिलांचें वतन मी तुमाला द्या- वें असें ईश्वर मजपासून नघडवू तें त्याचें उत्तर ऐकू न राजा दुर्मुखलेला रंजीस होऊन घरी आला आणि जेवण खाण सोडून पलंगावर जाऊन पडला कोणाला तोंड दाखवीना तेव्हां त्याची बायको जेजबल त्यावे जवळ येऊन बोलिली माझे प्रिया तुझें मन एवढें वि रस कां तूं जेवण देखील सोडिलेंस हैं काय तिला तो बोलिला अगे नाबोध जजरेलकराचा दाक्षमंडप आ है