पान:आदयशास्त्रकथन.pdf/७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७६) लेंकरूं नाहीं व तिचा नवराहि सातारा आहे तेव्हां अ- लीशा सणाला बरें तर तिला बोलाव मग ती येऊन दा- रापासीं उभी राहिल्यावर अलीशा बोलिला योजलेल्या काळीं तूं एका पुत्राला खेळवसील बरें ती बोलिली म हाराजा ईश्वरी माणसा तुझ्या दासीला असंभावित बो- लूं नको पण अलीशान्च्या बोलण्याप्रमाणें ती प्रसूत होऊन पुत्र झाला तो मुलगा चालूं लागल्यावर कापणी- च्या दिवसीं शेतांत बापाकडे गेला तेथें बापाला बोलि- ला माझे डोके दुखतें बापाने तेव्हांच आईकडे पाठविला नंतर तो मुलगा आपल्या आईच्या मांडीवर दुपारपर्य- त बसून तेथेंच मेला तेव्हां तिने त्याला माडीवर नेऊन त्या ईश्वरी पुरुषाचे पलंगावर ठेवून दार लाविलें आ णि आपण बाहेर गेली आणि आपल्या नवऱ्याला हा- क मारून ह्मणाली मजकडे एक माणूस व एक गाढव पाठवा मी त्या ईश्वरी पुरुषाकडे जाऊन येणार आहें न- वरा बोलिला तूं कां त्याजकडे आज जात आहेस ती बोलिली पुढें बरें व्हावें सणून आणि चाकराला लौक- र चालू असें बोलून ती कार्मेल डोंगरास ईश्वरीपुरुषा- कडे गेली तेव्हां ईश्वरी पुरुषाने तिला पाहून आपल्या चाकराला सांगितलें तूं जाऊन तिला तूं बरी आहेस तुझा नवरा बरा आहे तुझा मुलगा बरा आहे काय वि चार त्याप्रमाणें त्याने विचारल्यावर ती बोलिली होय आणि