पान:आदयशास्त्रकथन.pdf/८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८०) ली स्वारी घेऊन अलीशाच्या दारी जाऊन उभा राहि ला तेव्हां अलीशाने त्यास निरोप पाठविला किं तूं जा- ऊन यार्देन नदींत सात वेळा आंग धू ह्मणजे तुझा च र्मरोग दूर होऊन तूं साफ होसील पण तें नैमानाच्या मनास आलें नाहीं तो तेथून निघून बोलिला अलीशा बाहेर येऊन ईश्वर जो देव त्याच्या नावाने हाक मारून आपला हात रोग्यावर ठेवून कोड्याला नीट करील असें माझे मनांत होतें एरव्ही दामास्कस शहराच्या आमाना व फारपार नद्या इस्राएलच्या नद्यांपेक्षां फा रच बऱ्या आहेत मग मी त्यांतच धुवून साफ होणार ना हीं किं काय असे बोलून रागाने माघारें जाऊं लागला तेव्हां त्याचे चाकर त्याजवळ येऊन बोलिले दादा जरी भविष्यभाष्याने तुला मोठेंहि कठीण काम सांगितलें त- री तें तूं करायास तयार होतास त्यापेक्षां धुवून साफ हो हें त्वां कां नकरावें तें ऐकून त्याने यार्देन नदीकडे जाऊन ईश्वरी पुरुषाच्या बोलण्याप्रमाणें सात वेळा आं- गधुतलें तेव्हां त्याचें चर्म मुलाच्या चर्मासारिखें होऊ- न तो साफ झाला आणि आपल्या स्वांरीसुद्धां परत येऊन अलीशास बोलिला हे ईश्वरीपुरुषा इस्राएल दे- शाच्या देवाशिवाय दुसरा कोठें देव नाहीं हें मी पक्के समजलों तर आतां कृपा करून आपल्या चाकरापा- सून