पान:आदयशास्त्रकथन.pdf/९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९०) स्तुति करायास योग्य आहे आणि त्या त्रिवर्गाचा राजा- ने मोठा सन्मान केला अशा चमत्कारिक गोष्टी घडल्या- वरून परमेश्वराचें महत्व शक्ति पवित्रता इत्यादिक गु- ण फार प्रगट झाले आणि बहुत लोक स्तुति व मान करूं लागले. धडा २२. बाबेलदेशाच्या नबूखादनेज्जर राजाचा पुत्र बेलशाजारराजा ह्याविषयीं गोष्ट. बेलशाजार नामक बाबेलदेशच्या राजाने एक दिन वस आपल्या एक हजार नामांकित सरदारांला मेज- वानी केली तेव्हां आपल्या बायका राखी सरदार या सर्वाला द्राक्षरस प्यायाला सोन्यारुप्याची भांडी आप ल्या बापाने यरुशलेमाच्या देवळांतून काढली होती ती आणयायाचा हुकूम केला तेव्हां लोकानी ईश्वराचें दे ऊळ जें यरुशलेमनगरांत होतें त्यांतील ती भांडी आ णिलीं आणि राजा सरदार बायका राखी हीं सर्व त्या भांड्यातून द्राक्षरस प्यालीं आणि सोनें रूपें तांबें लो खंड