पान:आदयशास्त्रकथन.pdf/९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९३ : काम केलें आणि देवळांतली भांडी आणून त्यांतून तूं तुझे सरदार बायका राखी आदिकरून तुह्मी द्राक्ष- रस प्यालेत आणि पाहत नाहींत ऐकत नाहींत सम- जत नाहींत असल्या सोनें रूपें तांबें लोखंड काठ पा- षाण इत्यादिकांच्या मूर्तीची त्वां स्तुति केली ज्या ईश्व- राच्या हातीं तुझा श्वास आहे ज्याकडून तुझें चालणें आहे त्या ईश्वराचें गौरव त्वां केलें नाहीं हणून हा हा तव हें लिहिणें झालें आतां तें सांगतों ऐक. मेनेमेने ते केल अपहारसीन. याचा अर्थ मेनेमेने ईश्वराने तुझें राज्य मोजून संपविलें. ते केल तुझें तोलणें होऊन तूं तोलांत कमी भरलास. अपहारसीन तुझें राज्य विभागून मेदेस व पारसीस ह्यांस दिलें. तो अर्थ ऐकून बेलशाजार राजाने दानीयेलास तांबडा पोषाक व सोन्याची कंठी दिली आणि जाहीरनामा ला- विला किं दानीयेल ह्या देशाचा तिसरा अधिकारी झाला आहे त्याच रात्री बेलशाजारास मारून देरयस जो मे दे- सलोकांचा सरदार त्याने राज्य घेतलें. धडा २३