पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहारशास्त्र

मुलें फक्त दूध किंवा फक्त ताक घेत असत, व कांही दोन्हीही घेत नसत. कांही मुलें प्लीहा वगैरे पेशी आवडीने खात, काही मुळीच खात नसत. काही मुलें संत्र्यांचा रस २० ते ४० औंस पीत, काही फारच थोडा पीत. यावरून जें अन्न मुलांना चांगले असें लोक समजतात तें पुष्कळ वेळां मुलें निवडीत नाहीत हे स्पष्ट दिसते, कारण कांही मुले मोठ्या माणसांपेक्षाही जास्त मांस व फळें खात असत, दररोज वीस औंसांपेक्षा जास्त दूध कोणी क्वचितच पीत असे, आणि दोन मुलांनी तर कित्येक महिनेपर्यंत दुधाला स्पर्श केला नाही. स्पिनॅच् ( माठ) उत्तम समजतात तो त्यांना आवडत नसे, आणि दूध सोडल्यावर आपण त्यांना धान्य देतो, पण ते ती फारसें खात नसत.
 इतर मुलांप्रमाणे त्यांनाही कधीकधी सर्दी होत असे आणि एकदां तर सांथच आली. या वेळी देखील अन्नाच्या व्यवस्थेत बिलकुल फरक केला नाही, आणि कितीही ताप असला तरी त्यांच्यापुढे नेहमीप्रमाणे अन्न ठेवीत असत, सर्दीचे आरंभी ती आपोआपच थोडे कमी खात, परंतु बरी होऊ लागली म्हणजे एकदम जास्त भूक लागून कच्चें गोमांस, गाजरें व बीट यांवर सपाटून हात मारीत. गर्मीचे दिवसांत मांस, बटाटे व धान्ये जास्त खात. एकंदरीत आपण जितकें अन्न मुलांना पुरे असे समजतो, त्यापेक्षा ती नेहमी जास्त खात, आणि आवडी वेगळ्या असल्या तरी हवेच्या व गरजांच्या मानाने ती खात असत.
 या प्रयोगांतील तीन मुलांवर डॉ. डेव्हिस् यांनी विशेष लक्ष ठेवले होते, त्या म्हणतात की आरंभी मुलांनी अमुक पदार्थ कशावरून निवडला हें सांगणे कठिण आहे. हातास आला तो घेतला, की रंगावरून अगर वासा- वरून निवडला हे सांगता येणार नाही. परंतु काही दिवसांनंतर मात्र ती बिन- चुक पाहिजे तोच पदार्थ घेत, मग इतर पदार्थ जास्त जवळ असले, किंवा त्यांचा रंग अधिक आकर्षक असला, तरी हरकत नाही. अर्थात् तोंडात घातलेला पदार्थ थुंकून टाकला असें आरंभाला झालें, पण पुढे कधीही झाले नाही. ही तिन्ही मुले पुढे ठेवलेले बहुतेक पदार्थ खात असत. पण एका जेवणाला तीन पदार्थांचे वर