पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहारशास्त्र

कृत्रिमतेने होत नाही. कारण अन्न हा प्रकृतीचा पाया आहे.अरण्यांत आपोआप लागलेल्या आगीत चुकून भाजलेला एखादा पदार्थ मनुष्याने खाऊन पाहिला, आणि तो त्याला आवडल्यामुळे त्याने विस्तवाचा संग्रह केला, आणि तेव्हा प्रथम अग्निहोत्राला सुरवात झाली, कारण अग्नि पेटविण्याचे साधन नसल्यामुळें तो जिवंत ठेवावा लागे. नंतर तो कृत्रिम रीतीने पाहिजे तेव्हा पेटवता येऊ लागल्यावरही कांही बेअकली लोक अग्नि जिवत ठेवण्यांतच पुण्य मानु लागले ! परंतु अग्नीने मनुष्याचे जेवढे कल्याण केले आहे त्यापेक्षा जास्त नुकसान केले आहे, कारण विंस्तवाने अन्नात अत्यंत हानिकारक फरक होतो. पण हे नैसर्गिक परिस्थितीव्या बाहेर गेल्यामुळे येथे नैसर्गिक प्रेरणा काम करीना आणि केवळ जीभ व नाक हीच मार्गदर्शक झाल्यामुळे मनुष्य निसर्गात सांपडणारे अनेक पदार्थ भाजून,शिजवून, तळून खाऊं लागला, इतकेच नव्हे तर जसजशी नवीन साधने सांपडूं लागली, तसतसा मनुप्य निसर्गाला सोडुन चालला, आणि भाकरी, लोणी, तूप, चीज, चौकोलेट् वनैरें निसर्गांत कधीही न सांपडणारे पदार्थ खाऊं लागला आणि या बाबतीत त्याला नैसर्गिक गरजांची फिकीरच राहिलेली नाही. भूक किंवा तहान लागलेली असो वा नसो, मनुष्य नेहमी चमचमीत पदार्थ आणि स्वादिष्ट पेंयें पोटांत लोटायला तयार असतो.
 ही सर्वस्वी मनुव्याची चूक आहे असे म्हणतां येणार नाही. मूळचे फळांसारखे त्यादिष्ट पदार्थ मिळत नाहीसे का झाले, याचे कारण केवळ मनुष्याला विस्तवाची युक्ति सांपडली एवढेच नव्हे हा केवळ एक अपघात म्हणतां येईल.परंतु फळांचा पुरवठा संपण्याचे मुख्य कारण म्हणजे सिंहृव्याघ्रादि हिंस्र पशूंपासून मनुष्याला आपले संरक्षण करतां येऊं लागले, यामुळे त्याला खाणारा किंवा मारणारा कोणी प्राणि राहिला नाही,आणि यामुळे माणसांची संख्या अमर्याद वाढू लागली. तेव्हा केंवळ फळांवर राहणें अशक्य झाले, कारण सर्वांस पुरेशी फळ मिळेनात आणि दुसरे काहीतरी अन्न शोधून काढल्याशिवाय मार्ग नव्हता.इकडे विस्तवाच्या शोधामुळे मुख्यत:धान्ये खाता येऊं लागली आणि

१८