पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आपण जिवंत कसें राहतों?
-----:०:-----

प्राणि आणि वनस्पति असे जिवंत सृष्टीचे दोन भेद मानलेले आहेत, परंतु हे भेद केवळ मानीव आहेत आणि स्थूल यानाने जरी आपण अमुक प्राणि आहे आणि अमुक वनस्पति आहे असें ग्ह्णतों, तरी कित्येक जीवांच्या बाबतीत हा प्राणि की वनस्पति असा संशय उत्पन्न होती. ते कांही असले तरी दोहोंतही जिवंतपणा असतो, तेव्हा दोहोंत सामान्य गुण काय आहेत हे पाहून जिवंतपणाचीं व्याख्या करतां येईल. यावरून असे ठरते की बाहेरून काही पोषक पदार्थ आंत घेणे आणि शरीरातील टाकाऊ झालेला भाग बाहेर टाकणे ही जिवंतपणाचीं लक्षणें आहेंत.हे पोषक पदार्थ पचवल्याने सर्व जीवनव्यापारांना लागणाऱ्या शक्तीचा पुरवठा होतो, आणि शरीराची जी झीज होते तीही या पोषक पदार्थांतून म्हणजे अन्नांतूनच भरून निघते. अत्यंत सूक्ष्म जीवांपासून तो मोठया प्राण्यांपयेत सर्वच जीवांच्या शरीरात ही घडामोड सर्वदा चालू असते, कारण जीवनाचा अर्थच हा. ही घडामोड बंद होणे म्हणजेच मरण.
 या घडामोडींची सामान्य नाही तर सांगितली.तरी देखील जीवांच्या प्रत्येक जातीत या क्रियेत फरक असतो, इतकेच नव्हे तर प्रत्येक व्यक्तींचे बाबतीत देखील त्यात फरक असतो. प्रत्येक व्यक्तींचा एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक छाप असतो आणि बाहेरून आत घेतलेल्या प्रत्येक पदार्थावर हा रासायनिक छाप बसल्याशिवाय ग्हर्जेण त्यांत जरूर तो रासायनिक फरक झाल्याशिवाय तो पदार्थ शरीरासीं एकजीव होऊं शकत नाही. मोठ्या प्राण्यांचे बाबतीत हें रासायानिक स्थित्यंतर झाल्यावर तो पदार्थ रक्तात शिरतो, आणि रक्ताभिसरणामुळे सर्व शरीरात फिरून जीर्ण भागांना नवजीवन देतो. तेव्हा जे पदार्थ आपल्या शरीराचे

२०