पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहाराचे घटक - १

सच त्यापासून फायदा होतो, पण फाजील खाल्यास नुकसान होते. याकरता मांस,अंडी वगैरे जास्त प्रोटीन असलेल्या पदार्थांचे प्रमाण अन्नात नेहमी बेतात ठेवावे आणि भाज्या, फळें वगैरेचे प्रमाण नेहमी जास्त असावे.

 प्रोटीनमध्ये वेगवेगळी ‘अँमीनो अँसिडे' असतात हे वर सांगितलेच आहे.पचनाच्या क्रियेने त्यांची मनुष्याच्या शरीराला योग्य अशी रूपें बनतात.या बाबतीत प्रत्येकप्राण्यात व मनुष्यात व्यक्तिशः फरक असतो आणि यामुळे सर्वच प्रोटीन सर्वांना सोंसत नाही.अंडी खाल्ल्याबरोबर एखादा मनुष्य बेशुद्ध होतो किंवा अंगावर काहीतरी उठते, किंवा विशिष्ट प्रकारचे प्रोटीन खाल्यास कित्येकांस दमा होतो, याचे कारण हेच आहे. प्रोटीनचे शरीरात पूर्ण ज्वलन होत नाही. ते जळल्यावर ‘यूरिआ’ व इतर टाकाउ पदार्थ राहतात, व ते नियमितपणे मूत्राच्या किंवा घामाच्या द्वारे बाहेर जावे लागतात.न गेल्यास प्रकृत्तीला अपाय होतो.

 अन्नातील कोणताही पदार्थ फक्त प्रोटीनचा बनलेला नसतो,त्यांत इतरपदार्थही असतात. अंडयांतील पांढरा भाग मुख्यत: प्रोटीन व पाणी यांपासून बनलेला असतो. दुधापासून केलेली ‘ केसीन' नांवाची जी पूड मिळते,ती जवळजवळ शुद्ध प्रोटीन असते. प्रोटीन संबंधी शाकाहारी लोक असे विधान करतात की कवचीच्या फळात व द्विदल धान्यांत जवळजवळ मांसाइतके प्रोटीन असते हे खरे असले तरी एकतर ते कमी प्रतीचे असते,व ही धान्ये शिजतांना फुगतात आणि पण त्यातील प्रोटीनचे प्रमाण वजनाचे मानाने कमी होते.

 खनिजद्रव्ये. प्रोटीनचा उपयोग जसा शरीराची झीज भरून काढण्याकडे होतो, तसाच खनिज द्रव्यांचाहि होतो. सोडिअम, पोटँसिअम्, कँल्सिअम्, मॅग्नेशियम व लोह ही द्र्व्यें अतिशय महत्त्वाची आहेत व शरीरात बऱ्याच प्रमाणांत असतात. मैंगेनीज, जस्त्त, तांबे, लिथिअम्, बेरिअम, ही पुष्कळच कमी प्रमाणात असतात. या द्र्व्यांपासून शरीरात अल्कली उत्पन्न होतात. आणि फॉस्फरस, गंधक, क्लोरीन, आयोडिन,सिलिकॉन, फ़्लुओरिन यांपासून आम्ले

२९