पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रस्तावना


आहारशास्त्रावर पुस्तक लिहिण्याचा प्रस्तुत लेखकाचा पुष्कळ दिवसांचा इरादा होता,परंतु वेळाच्या अभावी तो बेत मनांतच राहिला होता. इतक्यांत या विषयावरील पुस्तकाला एका गृहस्थांनी बक्षिस ठेवल्याचे समजले,आणि त्याकरता अमुक तारखेपर्यंत पुस्तकें किंवा हस्तलिखिते पाठवणे जरुर होते.त्याप्रमाणे यंत्रलिखित तयार करून पाठवलेही ,परंतु मध्यंतरी प्रकूत्ति बरीच बिघडल्यामुळे तें लिखाण स्वतःलाच समाधानकारक वाटलें नाही. त्या बक्षिसाचा निकाल होण्यास आणखी कांहीं महिने लागतील असा अंदाज आहे, तथापि त्यांत शक्य तितकी सुधारणा करून आणि बरीच भर घालून, त्या निकालापूर्वीच तें प्रसिद्ध करण्याचे ठरवलें आणि तें प्रस्तुत स्वरुपांत प्रसिद्ध होत आहे.

हे लिहिण्याचे कामी डॉ. स. बा. गाडगीळ यांनी कालेजांतील विद्यार्थ्यांकरता तयार केलेल्या एका व्याख्यानाचें हस्तलिखित मला दाखवल्याबद्दल, आणि पुणे येथील 'कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर' मधील सेंवानिवृत्त प्रोफेसर रावबहादुर डॉ.द.ल.सहृस्रबुद्धे यांनी आपल्या पुस्तकाच्या प्रती मला पाठवल्याबद्दल,मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. निर्जीव अंड्यांसंबंघी सूचना डॉ. गाडगीळ यांची आहे आणि विशेष महत्त्वाची आहे. त्याशिवाय पुढील ग्रंथांचाही आधार म्हणून उपयोग केला आहे :-

1.Food Values at a Glance, by Violet Plimmer


2.Food, by Dr. Robert McCarrison


3. Rajeunir.by Maurice Phusis,Biologist (French )