पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहाराचे घटक-२

असते.तसेच कॅल्सिअम अंगीलागण्यासही चरबीची मदत होते व रोगजंतूंपासूनही संरक्षणं होते. वाढीच्या वयात चरबीची जरूर जास्त असते. परंतु नंतर तितकी नसते आणि ती जास्तखाल्ल्यास अपचन व मलावरोध होतो आणि ती शरीरात फाजील सांठून राहून शरीर बेढब दिसते, इतकेच नव्हे तर तितकें वजन जास्त बाळगावें लागल्याने त्रासही होतो.शरीरात चरबीचें योग्य रीतीने संपूर्ण ज्वलन होण्याकरतां ‘ए’व‘बी’ व्हिटॅमीन,कार्बोहायड्रेट व आयोडींन ही योग्य प्रमाणात असावी लागतात. चरबीचा उपयोग विशेषतः शरीर गरम राखण्याकडे होतो.

 जळण म्हणून उपयोगाला येणारे पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेट (सर्व धान्यात हा पदार्थ मुख्य असतो), साखर, गू व मध यांचा यांतच समावेश होतो.चरबी व कार्बोहायड्रेट या दोहोतील रासायनिक घटक कार्बंन(कोळसा ), हायड्रोजन व ऑक्सिजन हेच तीन असतात,परंतु कार्बोहायड्रेटमध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन या दोहोचा संयोग होऊन पाणी बनलेले असते, यामुळे चरबीतील हायड्रोजन जसा जळू शकतो, तसा कार्बोहायड्रेटमधील जळत नाही. यामुळे प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट जळून जितकी उष्णता उत्पन्न होते. त्याच्या दुप्पट तितक्याच वजनाच्या चरबीपासून मिळते. कार्बोहायड्रेट फाजील प्रमाणांत खाल्ल्यास त्याची चरबी बनते व शरीरातील चरबीचा सांठा वाढतो. कोणत्याही नैसर्गिक अन्नात केवळ कार्बोहायड्रेट नसते. साबुदाणा, आरारूट,तवकील, वगैरे कृत्रिम रीतीनें तयार केलेल्या पिठूळ पदार्थांत प्रोटीन,खजिनद्रव्ये, व व्हिटँमीन बिलकुल नसतात. यामुळे अन्नाच्या दृष्टीने त्यांची किंमत फारच कमी आहे. कार्बोहायड्रेटचे पचन होतांना त्याची साखरच बनते आणि याच स्वरूपांत ती रक्तात मिसळते. यावरून शुद्ध साखरच खाणे बरे असे कित्येकांस वाटेल,पण ती चूक आहे. कार्बोहायड्रेटची हळूहळू साखर बनत जाते आणि त्यापासून एकदम शुद्ध साखरेंचा रस बनत नाही, परंतु शुद्ध साखरच खाल्ल्यास ती आत्मसात होण्यापूर्वीच आंबण्याचा संभव असतो. कार्बोहायड्रेटचे पचन होऊन साखर बनली, म्हणजें या सर्वच साखरेचा ताबडतोब उपयोग नसल्यामुळें तीतील कांही भागाचा‘ग्लाय

३३