पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहारशास्त्र

जवळ दुसरें कांहीही खात नाही. अशा ठिकाणीं त्याला नेऊन सोडल्यावर, त्याला मासे पकडण्याची बिलकुल संवय नसतांही, त्याने जराही न कचरतां पाण्यांत बुडी मारली आणि एक मासा पकडून बाहेर आणून तो खाऊं लागला. म्हणजे योग्य स्थितींत आल्याबरोबर त्याची नैसर्गिक प्रेरणा पूर्णपणे जागृत झाली. त्याच प्रमाणे त्याने वानराच्या पिल्लालाही दोन दिवस उपाशी ठेवल्यावर त्याच्या नैसर्गिक स्थितींत म्हणजे रानांत नेऊन सोडलें. परंतु खूप भूक लागली असतांही त्याला काय करावें हें समजेना, कारण त्याच्या नेहमीच्या संवयीचा एकही पदार्थ त्याला तेथें दिसेना आणि उपजत प्रेरणा बिलकुल नव्हती. यूरोपांतल्या एका लहान मुलाला एक नग्न माणसाचें चित्र दाखवून ' हा पुरुष कीं बायको ?” असें विचारलें असतां तो म्हणाला, ' त्यांच्या अंगावर कपडे नाहीत, मग मी कसें ओळखूं ?" तशी त्या वानराची अवस्था झाली. नंतर त्या माणसाने तेथला एक दगड बाजूला केला, तों खालीं एक विंचू दिसला. तेव्हा तो पकडून त्याची नांगी तोडून त्याने वानराच्या हातांत दिला. त्याने कांही वेळ विचार करून, खूप भूक लागली असल्यामुळे तो तोंडांत घातला आणि खाऊन टाकला. नंतर हा प्रयोग त्याने स्वतः करण्याकरतां एक दगड उचलला आणि खालचा विंचू उचलतो तो त्यानें नांगी मारली. त्या दुःखाने तो ओरडूं लागला, पण भूक कायम होतीच. तेव्हा त्याने एका झाडावरील फळ खाल्ले, पण तें विषारी असल्यामुळे त्याला बराच त्रास होऊं लागला आणि एकदम डाक्त- राकडे न्यावे लागले. याचा अर्थ असा कीं वानर नैसर्गिक स्थितीत असतां, विंचू कसे पकडावे, कोणतीं फळे खावी, कोणतीं खाऊं नये, वगैरे गोष्टी आईबापांपासून शिकतात, त्या त्यांना उपजत प्रेरणेनें येत नाहींत. आणि मनुष्यांत तर आईच्या अंगावरचें दूध कसें प्यावें हें देखील मुलांना शिकवावें लागतें, आणि पाजतांना मुलांना मांडीवर आडवें घालून पाजूं नये, उभें बसवून पाजावें, हें आयांनाही कळत नाहीं. परंतु मनुष्यांत देखील नैसर्गिक उपजत प्रेरणा अगदींच नाहीशा झालेल्या असतात असें नाहीं. याचे उदाहरण म्हणून अमेरिकेत केलेला पुढील प्रयोग लक्षांत