पान:आमची संस्कृती.pdf/144

हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / १३७


शाळेत किंवा कॉलेजात नेमाने जातात का? दिवसाचा किती वेळ अभ्यासात घालवतात? ती कोणत्या विषयात कच्ची आहेत? या साध्या गोष्टींकडे लक्ष पुरविणारे आईबाप किती आहेत? कर्तव्यतत्परतेचे धडे घरी किंवा बाहेर किती प्रमाणात मिळतात?

 मुख्य शिक्षण, अव्याहत मुलांचे हवे
 पूर्वी मुलींना शिक्षण म्हणजे मोठा लाभ वाटत असे. कॉलेजातील शिक्षण तर वडील माणसांशी भांडून भांडून मिळवलेले असे. इतरांना नाही असे काहीतरी आपल्याला मिळाले आहे व त्याचे चीज करून दाखविले पाहिजे, ही जाणीव घरची मंडळी व समाज यांजकडून सारखी मिळत असे. आता मुलींना मुलांच्या बरोबरीने शाळेत घालतात. त्यात काही विशेष असे आपल्याला मिळते असे त्यांना वाटले नाही तर त्यात काही नवल नाही. प्रत्येकीने शाळेत गेलेच पाहिले का गं!' असे विचारणाच्या काही मुलीही मी पाहिल्या आहेत.
 मुलींच्या वागणुकीतही फरक पडला आहे. मुलीचा पाय वाजता कामा नये, हसताना आवाज ऐकू येता कामा नये, रस्त्याने जाताना उजव्या भुजेवरील पदर ढळता कामा नये, असे कितीतरी नियम होते. असे हल्लीचे वागणे नाही. त्यावरून हल्लीच्या मुली मर्यादशील नाहीत असे म्हणता येईल का? मुसलमानी मुलखात स्त्रियांच्या शरीराचे कोणतेही भाग दिसत नाहीत म्हणून त्या स्त्रिया जास्त मर्यादशील असे म्हणता येईल का? बाह्य वागणुकीच्या तन्हा, देशकालसापेक्ष असतात. केवळ पूर्वीची तहा आज नाही यावरून मर्यादा कमी झाली, असे म्हणता येत नाही.
 बिनबाह्याचे पोलके, कापलेले केस, तोंडाला थोडीबहुत पावडर अशी वेषभूषा व केशभूषा देशांतील सर्वमान्य स्त्रिया- उदाहरणार्थ विजयालक्ष्मी पंडित- करतात. त्या स्त्रियांनी देशासाठी त्याग केला नाही असे कोणी म्हणेल का? त्यांचे अनुकरण इतरांनी केले तर नवल काय? कोणी म्हणेल, बाह्य स्वरूपाच्या सजावटीत अनुकरण होते, इतर गोष्टींत होत नाही. पण हा सर्वसाधारण नियमच आहे.
 मुलामुलींच्या आयुष्यात आणखी काही गोष्टी या काळात प्रामुख्याने वळण लावणाच्या असतात. त्या म्हणजे सिनेमा व दर महिन्याला निघणारी