पान:आमची संस्कृती.pdf/155

हे पान प्रमाणित केलेले आहे.

१४८ / आमची संस्कृती

सामाजिक दर्जा प्राप्त झाला. पहिली अडचण नैसर्गिक आहे. दुसरी अडचण लोकभ्रमावर उभारलेली व लवकर नष्ट होणारी आहे. तिसरी समाजाच्या उत्क्रांतीबरोबर काही ऐतिहासिक घटनेमुळे निर्माण झालेली आहे व ह्या अडचणींविरुद्ध संबंध जगभर झगडा चाललेला आहे. ह्या तिन्ही अडचणी ज्या प्रमाणात दूर होतील त्या प्रमाणात स्त्रियांचे जीवन स्वावलंबी व स्वतंत्र होईल.

 मुलांची गरज
 स्वावलंबी होण्यासाठी गर्भारपण, बाळंतपण अजिबात टाळणे हल्लीच्या शास्त्रीय शोधामुळे शक्य झाले आहे; पण ते इष्ट आहे का? सबंध मानव संस्कृती ह्या दोन क्रियांवर अवलंबून आहे.
  ‘भूत निघाला तव उदरांतुन,
  वर्तमान घे अंकी लोळण,
  भविष्य पाही मुली! रात्रंदिन
  तव हाकेची वाट मनी'
 असे स्त्रीला उद्देशून एका कवीने म्हटले आहे. आता जगाच्या भवितव्याची मला काय पर्वा आहे! मला एक एवढे आयुष्य मिळाले आहे त्यांत ह्या शृंखला कशाला?' असे कोणी बाई म्हणेल; पण ती हजारात एखादीच सापडेल. अगदी स्वार्थी दृष्टीने, अगदी ह्याच आयुष्याचा विचार करावयाचा तरीदेखील आम्हा बायकांना मुलांची आत्यंतिक गरज आहे. आहार, निद्रा व मैथुन ह्या तीन मनुष्याच्या प्राथमिक गरजा आहेत असे एक कवी म्हणतो. तो जर स्त्री असता, तर चवथी गरज किंवा भूक अपत्य आहे हे तो विसरता ना! कोणत्याही प्राण्याचा शरीरविकास व मनोविकास दोन्ही बरोबर होत असतात. पुरुषांना बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था अशा तीनच अवस्थांतून जावे लागते. बाल्यांतून तारुण्यात प्रवेश होताना शरीररचनेत व मनोव्यापारात मोठ्या घडामोडी होतात व वृद्धावस्थेपर्यंत मनाचा व शरीराचा विकास होतो. स्त्रियांना बाल्यानंतर तारुण्यांतील दोन अवस्थांतुन जावे लागते. एक पत्नी म्हणून व दुसरी माता म्हणून; व दोन्ही केलेला शरीरांत व मनात प्रचंड चालना मिळते. मैथुन ही पुरुषाच्या