पान:आमची संस्कृती.pdf/162

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / १५५

जम बसविण्याचा अट्टाहास करू नये. वीसबावीस वर्षांच्या आंत लग्न करावे. वैवाहिक आयुष्यांत दुसच्याबरोबर राहावयाचे असल्यामुळे दोन माणसांना एकमेकाशी जुळवून घ्यावे लागते. दोघांच्या सोईनुसार रोजचा कार्यक्रम असावा लागतो. पुष्कळशा जुन्या सवर्यात बदल करावा लागतो. सबंध आयुष्यालाच एक निराळे वळण लागते. हे सर्व स्थित्यंतर सुखाचे होण्यास लवचिक तरुण मनाची आवश्यकता असते. ह्या दृष्टीने लग्नाची पहिली दोन वर्षे महत्वाची असतात. एकमेकांचा स्वभाव कळून, प्रीतीची पहिली धंदी ओसरून जीवनाचा प्रवाह परत संथपणे वाहू लागण्यास एवढा तरी कालावधी लागतो. ह्या दोन वर्षातील हजार भांडणे व कुरापती ह्यांतून सहीसलामत निभावल्यास पुढचे आयुष्य विशेष भांडणाशिवाय जाईल असे म्हणण्यास हरकत नाही. मुले होण्याच्या आधी संसाराची घडी नीट बसलेली बरी. लग्न झाल्यापासून तो वयाच्या पंचेचाळीस वर्षांपर्यंत गर्भारपण व बाळंतपण ह्या चक्रातून वर डोके काढण्यास पूर्वी बायकांना सवड होत नसे. हल्ली संततिनियमनाच्या साधनांमुळे मुलांची संख्या व दोन मुलांमधील अंतर आपल्या मनाप्रमाणे ठेवता येते. एक चालतेबोलते मूल, एक पाळण्यातले मूल व एक पोटातले मूल असा त्रास हल्ली काढण्याची जरूरी राहिलेली नाही. स्त्रियांच्या स्वतंत्र जीवनाचे संततिनियमन हे पहिले साधन आहे असे मी म्हणते. त्यामुळे ऐन तारुण्यात, संसारात राहूनही स्वत:चा व्यवसाय सांभाळणे बायकांना शक्य झाले आहे.

 वैवाहिक जीवन
 लग्न झाल्यावर काही काळ तरी स्वत:ला विसरून जाण्याकडे बायकांची प्रवृत्ती असते. गतकाळच्या स्मृती आणि वर्तमान काळातील शून्यता एवढीच शिल्लक राहतात. हे टाळण्यासाठी आणि स्वतचे जीवन आणि आपल्या संसारातील इतरांचे जीवन परिपूर्ण करावयाचे असल्यास स्वत:चे स्वतंत्र असे आध्यात्मिक व व्यावसायिक जीवन असणे आवश्यक आहेसुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ कै. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर ह्यांनी मरणापूर्वी थोडेच दिवस अगोदर वैवाहिक जीवनावर एक लेख लिहिला होता. त्यांत ते म्हणतात की, ‘ज्या प्रमाणात मवरा व बायको आपापल्या स्वतंत्र व्यवसायात गर्क राहतील त्या प्रमाणात कौटुंबिक जीवन सुखाचे