पान:आमची संस्कृती.pdf/163

हे पान प्रमाणित केलेले आहे.

१५६ / आमची संस्कृती

होईल. अशा त-हेच्या कौटुंबिक जीवनात सर्वांनाच फायदा होतो. न्याहीपुढे जाऊन मी म्हणेन की, स्वत:च्या चिमुकल्या संसाराबाहेर नमाजाचा जो संसार चालला आहे त्यांत प्रत्येक स्त्रीने मन घातले पाहिजे. समाजाचे देणे म्हणून जे मी म्हटले ते हेच. बाळपणी समाजाकडून घेणे घेतलेले असते. घेताना व्यक्तीचा जो विकास होतो त्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक विकास समाजऋण प्रामाणिकपणे फेडण्याने होतो. ज्या दिवशी आम्ही आमचे घेणे व देणे कसोशीने, जागरूकपणे घेऊ आणि देऊ त्या दिवशी आम्हा बायकांचा प्रश्न आपोआपच सुटेल. आम्हांला आमच्या मानव्याची जाणीव होईल व बायकांच्या हक्कांची भाषा जाऊन प्रत्येक मनुष्याच्या हक्काची भाषा आम्ही बोलू लागू.

- १९५१