पान:आमची संस्कृती.pdf/164

हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / १५७









 १३. कॉलेजातील शिक्षण व परीक्षा-पद्धती



 जुन्या समाजव्यवस्थेतील शिक्षण व परीक्षा
 परीक्षापद्धती ही सर्वस्वी नसली तरी बरीचशी अभ्यासक्रम व शिक्षणपद्धतीवर अवलंबून असते. काही एका कालखंडात मुलाला शिकवायचे व नंतर तो काय शिकला ह्याची चाचणी करायची अशी आपल्याकडील सध्याची पद्धत आहे. विद्यार्थी शिकत असतानाच सारखी त्याची चाचणी करावयाची व पहिले शिकवलेले तो जसजसे आत्मसात करील तसेतसे पुढे शिकवीत जायचे अशी दुसरी पद्धत आहे. जुन्या काळी आपल्याकडे जे शिक्षण गुरुगृही दिले जाई ते ह्या दुस-या प्रकारचे असे. एका गुरुकडे मोजकी मुले असत. ती गुरुजींकडे जेवीत, व गुरुजींच्या घरचे पडेल ते काम करीत. अशा मुलांना शिकवायचे म्हणजे ग्रंथ बहतेक नसतंच. एखादी पोथी असलीच तर ती फक्त गुरुजींजवळ असे व गुरुजी मुलांना तोंडी शिकवीत व त्यांच्याकडून पाठ करून घेत. शिकवलेले पाठ झाले की पुढे शिकवीत. ज्यांचे होत नसे ती मागे राहत. एकाच गुरुजींकडे शिक्षणाच्या निरनिराळ्या पायरीवर असलेले विद्यार्थी असत. कदाचित पढे गेलेले विद्यार्थी नवशिक्यांचे किंवा मागे राहिलेल्यांचे अभ्यास करून घेत असतील. अशा पद्धतीत शिकवणे व परीक्षा ह्या क्रिया जोडीने चाललेल्या असत. पुढे पाठ व मागे सपाट होऊ नये म्हणून मागच्यांची परत परत