पान:आमची संस्कृती.pdf/166

हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / १५९

योग्य त-हेने शिकवणे कसे शक्य होईल हा आपल्यापुढील प्रश्न आहे.

 शाळकरी विद्यार्थी व कॉलेजातील विद्यार्थी
 शाळांतील अभ्यासक्रम व शिकवण्याची पद्धत ह्यांचा सांगोपांग विचार केला नाही तरी एका गोष्टीकडे लक्ष वेधणे जरूर आहे. शाळांतील अभ्यास मोजका असतो. पुस्तके नेमलेली असतात व प्रत्येक धडा शिक्षक वर्गात करून घेतो, त्याचे प्रश्न विचारतो, त्यावर घरी अभ्यास देतो व मुलांनी लिहून आणलेला अभ्यास तपासतो. त्याशिवाय प्रत्येक शाळेत आठवड्याच्या, महिन्याच्या, सहामाहीच्या व सरतेशेवटी वार्षिक अशा परीक्षा असतात. म्हणजे मुलांना शिकवणे, त्यांच्याकडून अभ्यास करून घेणे व चाचणी ह्या क्रिया सारख्या चाललेल्या असतात.
 शालान्त परीक्षेनंतर दिसायला विषय जरी मोजके असले तरी ते विस्तारपूर्वक शिकावे लागतात. एकेका तासांत शिक्षक दहा पाने, पंधरा पाने ते एम.एम.ला दोनशे पानांचा ऐवज शिकवीत असतो. शाळेत विद्याथ्र्यांचा अभ्यास वर्गात व घरी दिलेल्या अभ्यासाने करून घेता येतो. कॉलेजात जसजसे पुढे जावे तसतशी मुलांनी स्वत: करावयाच्या अभ्यासाची जबाबदारी वाढते. शिक्षक विषय समाजावून देतो पण अभ्यास करून घेत नाही. सायन्सच्या बाजूला धड्याबरोबर प्रयोग चालवल्यामुळे शिकलेल्याची उजळणी होत असते, पण वाङ्मयेतिहास शाखेच्या बाजूला ते होत नाही. विद्यार्थ्यांचे वय वाढत असते व त्याने आपली जबाबदारी ओळखून न चुकता वर्गास हजर राहणे, लक्ष लावून शिक्षकांचे व्याख्यान ऐकून, ऐकता ऐकता टाचण करणे व घरी आल्यावर पुस्तक पाहून टाचण पूर्ण करणे एवढे केले तरीदेखील कोणीही नापास होईल असे वाटत नाही.
 शाळकरी मुलांप्रमाणे प्रत्यक्ष धडे करून न घेण्यामुळे प्रत्यक्ष धरे देण्याचा वेळ कॉलेजात थोडा असतो. बराच वेळ विद्याथ्र्यांना शेर मोकळा असतो व ग्रंथालयात किंवा घरी त्यांनी ह्या वेळांत अभ्यास अशी अपेक्षा असते. हे फारच थोडे विद्यार्थी करतात. काही विद्या पुस्तके विकत घेण्यास पैसे नाहीत असे ते म्हणतात. पण पुस्तकांची अडचण परीक्षा जवळ आली की त्यांना कळते. पहिल्या दिवसापासन अभ्यास करावयाचा ठरवल्यास ग्रंथालयात जाऊन पुस्तक पाहता येईल.