पान:आमची संस्कृती.pdf/177

हे पान प्रमाणित केलेले आहे.

१७० / आमची संस्कृती

वर्गात दिसले, त्याचे निबंध तपासले, त्याची परीक्षा घेतली म्हणजे तो एक अभ्यासी किंवा उनाड, हुशार किंवा मध्यम किंवा कमी डोक्याच्या हे। शिक्षकाला कळत जाते. त्याची संगत काय, तो वर्तनाने व शीलाने कसा आहे वगैरे कळत जाते. निरनिराळ्या शिक्षकांच्या एकत्र येण्याने व अनुभवाने मलांचे व्यक्तिमत्त्व काय असावे ह्याचा कयास शिक्षकांना येऊ लागतो व शिक्षक व मुख्याध्यापक ह्यांच्याशी विद्यार्थीही काहीशा आदराने, धाकाने, हक्काने व प्रेमानेही वागू लागतो. पुण्यातील सध्याच्या केंद्रीकरणाच्या विचित्र पद्धतीमुळे बी.ए.च्या वर्गात हे सर्व नाहीसे झाले आहे. हजेरी इतकी जुजबी असते की, दोन महिने हॉस्पिटलमध्ये पडलेल्या एका विद्यार्थ्याची पूर्ण हजेरी लागलेली आहे. निबंधलेखनाच्या पद्धतीचा फायदा नीटसा मिळतच नाही. कारण मुलांना आपल्या कॉलेजच्या वाचनालयात बसण्यास वेळच मिळत नाही. वर्गातील निम्मी मुले प्रोफेसरांनी आधी कधीही न पाहिलेली असतात. कॉलेजच्या कामावर म्हणजे पर्यायाने शिक्षकांच्या कामावर नियंत्रण असावे म्हणावे, तर कोण शिकवतो व कोण नाही त्याची बातमीही विद्यापीठाला लागत नाही. अशा परिस्थितीत मुलांच्या तिमाही अगर सहामाही परीक्षा नीटपणे घेऊन त्यांच्या अभ्यासाची प्रगती जोखणे कठीण आहे.
 परीक्षापद्धती अमकीच असावी असे नाही. पण शिक्षण व चाचणी बरोबर चालू राहावी म्हणजे विद्यार्थ्यांना वर्षाशेवटी भार पडत नाही व वर्षभर अभ्यास करावा लागतो. अशासाठी फक्त परीक्षांचीच पद्धत बदलून चालणार नाही तर कॉलेजातील शिक्षणपद्धती, कॉलेजे व विद्यापीठ ह्याच परस्परसंबंध, नेमलेले विषय व त्यांच्या स्पष्ट मर्यादा आखलला शिक्षणक्रम व परीक्षा अशा सर्वांचा एका वेळी विचार झाला पाहिजे.
 असा विचार नीट होऊन फलनिष्पत्ती व्हावयाची तर तो खेळीमेळीच्या, देवघेवीच्या व सहकार्याच्या भावनेने झाला पाहिजे. एका बाजूने अधिकारी व एका बाजूने नोकर ह्या भूमिकेतून संघर्ष व कडवटपणा मात्र येईल व परीक्षा सुधारणेच्या नावाखाली एखादे नवेच भूत विद्याथ्र्यांच्या व शिक्षकांच्या मानगुटीस बसावयाचे- ह्याची काळजी घेतली पाहिजे.