पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/२३

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनाला थोडी तरी मुरड घालायची ठरलं. म्हणून गटानं नियम केला की मिसरी लावून गटाला आलं तर १ रुपये दंड. “सुरूवातीला मिसरी लावणं थोडी कमी करू" असं म्हणत निदान एक दिवस तरी एक तास तरी लावू नकोया, मग जमेल हळूहळू. असं म्हणत एकटीनं ठरवून न जमणारी गोष्ट गटामुळे करायचं साऱ्यांनी ठरवलं.
जामीनदाराची विश्वासाची हमी
 'व्हय मला या बी खेपंला उचल पायजे. दुसऱ्या कोनाला नको असंल तर जमलेली रक्कम मी उचलू का?'
 सरूबाईंचा प्रश्न ऐकून गट जरा विचारात पडला. गट सुरू होऊन सहा महिने झाले होते. तिसऱ्या महिन्यात पहिलीच उचल सरूबाईंनी घेतली होती. आणि आता पुन्हा तिलाच उचल घ्यायची गरज होती. पहिल्या उचलीची फेड ती नियमितपणे करत होती. गटातल्या कुणाचीच तिनं उचल घ्यायला हरकत नव्हती. पण गटात जमलेली सगळी रक्कम एकीकडेच ठेवणं बरं नाही, म्हणून गटात चर्चा झाली 'अवं ताई, तिचा झेंडू शेतात उभा हाय, १५ दिसावर दसरा आला. फुलं उमलाया नको? त्याला खत लागतं, म्हनून तिला पैसे हवं. देवू या की तिला' भामाबाई, सरूबाईंची शेजारीण म्हणाली.
 'व्हय, मी पुढच्याच महिन्यात सगळी फेड करेन', सरूबाई धीर येऊन बोलली. मग प्रश्न आला. 'जामीन कोण राहाणार?' यावर जरा शांतता पसरली. मग भामाबाईच म्हणाली- 'हजार, पाचशे कुठं घेऊन बसलात? हिचं शेत माझ्या दारात आहे. झेंडू गेला की त्याची पट्टी मीच घेईन ताब्यात. मी हाते जामीन, सगळ्या रकमेला.' सरूबाईंचा प्रश्न . सुटला. अडीनडीला लागते ती हक्काची मदत आता गटातूनच मिळायला लागली. झेंडूला खत मिळालं -मळा बहरला ! सरूबाईंची उमेद त्यापेक्षा दसपटीनं वाढली. गोष्ट फक्त सरूबाईंचा मळा बहरल्याची नाही, तर

तुम्ही बी घडाना ॥        १७