पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गटाची साथ, उद्योगी हात

थोड्या पैशाची पण वेळेवर मदत

 आंबवणं बाजाराचंच गाव. तिथे दर गुरूवारचा बाजार बसायचा, वीस गावचं माणूस बाजाराला यायचं. गटातली सुशाबाई, जिला वाटलं आपण गटात पैसे उचलावेत आणि करावं काहीतरी! तशी ती धडाडीची. तिनं उचलले हजार रुपये आणि आणले पोतभर कांदे बटाटे ! तागडं लावलं आणि विकायला बसली. एका दिवसात हजाराचे बाराशे झाले. १० दिवस पुरेल इतकी भाजी घरात शिल्लक राहिली. हरूप वाढला. वेळीच पैसा मिळाला, तर पैशानं पैसा वाढतो हे ऐकलेलं, तिला पण पटायला लागलं!

डोक्यावरलं दुकान

 वेल्ह्याची चव्हाणबाई, कष्टाला कमी नाही. पण कायम नशीबाला बोल लावायची. त्यात चार वर्षापूर्वी सारी वेल्ह्याची पेठ अपघातानं जळून गेली. तिचं पण नुकसान झालं, पण तिनं पुन्हा उभारी धरली. गाव बाजाराचं तिथं भाजीचं दुकान टाकलं. पण बाजार आठवड्यातला एकच वार. तेवढं तिला पुरेना. मग गटातनं पैसे काढले आणि पुण्याच्या बाजारातून पाटीभर वस्तूघेऊन आली. खेळणी, गाळणी, चमचे, डब्या, टोपल्या सारं प्लॅस्टिकचं रंगीत रंगीत. वेल्ह्यातल्या बाजाराला ज्या गवांमधून लोकं येतात त्या गावी गेली आणि हळी देऊन सामान विकू लागली. एक बाजाराचा दिवस माणसं तिच्याकडं यायची आणि बाकी दिवस ती माणसांकडे जायची. डोक्यावर टोपलीत मावेल तेवढं तिचं

तुम्ही बी घडाना ॥              २५