पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/४३

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कुसगावचं देऊळ विठोबा-रखुमाईचं. 'बाजूला बसायचं असल्यानं काहीजणी महिन्याच्या बैठकीला नियमितपणे गैरहजर रहायच्या. गटातल्याच सुमनबाईंनी यावर तोडगा काढला. ती म्हणाली 'विठ्ठलाशेजारी उभी हाय ती रखुमाईच न्हवं? मंदिरात तिला समजतं सगळं" आणि त्यानंतर गटाच्या बैठकीला सगळ्याजणी मोकळेपणानी यायला लागल्या.
बैठकी बसल्या आणखी कुठे कुठे
 शिवापूरच्या अनेकजणी बैठकीच्या निमित्ताने दर महिन्याला संस्थेत येऊ लागल्या. शिवरे वस्तीवरचे गटसमाज मंदिरात बसू लागले.
 "कुणाच्या घरी बसून मिधं कशाला व्हा?' असं म्हणत ससेवाडीचे गट ग्रामपंचायत कार्यालयात बसायला लागले.
 कांजळ्याचे गट 'गावकीची शाळा म्हणजे आपलीच' असे म्हणून रात्रीचे प्राथमिक शाळेत बसायला लागले.
 सणसवाडीचे गट बालवाडीत बसायला लागले.
 ह्या सगळ्या सार्वजनिक जागा आता महिलांनाही हक्काच्या वाटू लागल्या आहेत. प्रबोधिनीच्यावतीने काढलेल्या दिल्ली सहलीत भाग घेणाऱ्या काही प्रमुखांनी महिलांच्यासाठी गावात स्वतंत्र खोली बांधावी असा आग्रह नेत्यांकडे धरला आहे. बचत गटाच्या बैठकीच्या निमित्तानं घराचा उंबरा ओलांडणाऱ्या या महिलांना आता सर्व ठिकाणी वावरण्याची धिटाई आली आहे.

तुम्ही बी घडाना ॥                 ३७