पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/५७

हे पान प्रमाणित केलेले आहे.

गट तसे गाव
 गावोगाव आपले गट पसरले. मोठ्या गावांमध्ये १२-१५ तर लहान गावामध्ये ३-४ असे गट सुरू झाले. म्हणजेच लहान गावामध्ये ६०- ७० महिला, तर मोठ्या गावामध्ये २०० ते ३०० एकत्र जमायला लागल्या.गटांची गावातली ताकद वाढली.चांगल्या कारणासाठी दबाव आणायची एकी आणि हिंमत महिलांमध्ये आली, तर काय होतं, त्याची ही उदाहरणे.
आमची गटबाजी !
 गावामध्ये नवीन हातपंप बसवला संस्थेच्या कार्यकर्त्यांनी. हातपंप कसा काम करतो ते समजून दिलं. बजावलं. हातपंपावर धुणी धुवायची नाहीत. नाहीतर धुण्याचं पाणी जमिनीत मुरेल आणि पाणी खराब होईल.
 पण काय करणार. धुवायची विहिर खूप लांब होती. मग रखमा मनात म्हणाली मी एकटीनं तिथं धुणं धुतलं तर काही बिघडंत नाही आणि तिनं तिथंच धुतलंन् चार बायकांनी ते पाहिलं. तिला तिथं धुणं धुवायचं नाही हे सांगितलं. पण तिला पटेना. रात्री गटांची बैठक होती. त्यात हा विषय झाला आणि गावातल्या सर्व गटांनी नियम केला की गटातल्या 'कुणी बाईनं तिथं धुणं धुवायचं नाही आणि कुणाला धुवून द्यायचं नाही.' गावच्या आरोग्याचा प्रश्न आहे. नाहीतर त्या पाण्यानं आजार यायचा. दुसरा दिवस उजाडला . रोजच्यासारखी सरूबाई पुन्हा हपशावर धुवायला गेली. ठकुबाईनं पाहिलं तिनं सावित्रीला बोलावलं. ती रंजनाला घेऊन आली. तोवर ताराबाई तिथं पोहोचली. काय झालं बघायला अजून चार जणी जमल्या. तरी सरू ऐकेना मग मात्र एक जण
तुम्ही बी घडाना ॥              ५१