पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/६०

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुश्किल, आता गटामुळं गावात बायका बाहेर पडायला लागल्या. - गावातली ग्राम पंचायत सात जणींची झाली आणि त्या महिलांनी पंचायत . स्वतः चालविली. गावातल्या बायांचा आधार त्यांना होता.
  थोडक्यात म्हणजे महिलांनी स्वतःच्या घराला आधार देता देता, "स्वतःसाठी पण कितीतरी गोष्टी शिकून घेतल्या. पैशाचा व्यवहार, चार जणीत मिळन -मिसळन वागणं, धिटाईनं बोलणं, एकमेकींना समजून ... घेणं गावात गटाची ताकद निर्माण झाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे । गावातून-सावकार हकालपटदी झाली. हवी तेव्हा मदत घ्यायला, स्वतःचं । मन मोकळं करायला हक्काची जागा झाली आणि त्यातून ज्याचं मोल पैशातमोजता येणार नाही अशी एक गोष्ट मिळाली. तीम्हणजे बायकांना स्वतःचा विश्वास मिळाला.
 'ससेवाडीतल्या गटांचं नाव बँकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचलं. त्यांनी गंटांना भेट दिली आणि बघितलं, सगळे व्यवहार महिलाच बिनचूक आणि " शिस्तीनं करतायत. घेतलेली उचल जोखमीनं परत करतायत. गटाचं वळण तर त्यांना मोठ्या कौतुकाचं वाटलं, कारण महिलांनीच गटात कसं . . वागावं याचे नियम आणि नियम मोडणाऱ्यांसाठी दंडसुद्धा ठरवले होते. . बँकेच्या अधिकाऱ्यांना गटाचा विश्वास वाटला. लाखालाखांच्या . उलाढाली करणा-या प्रमुख बायका खात्यातले पैसे काढतात आणि व्यवहार करतात हे त्यांनी पाहिले. गटातल्या काही बायका स्वतःच्या हिंमतीवर उद्योग करायला सुद्धा तयार आहेत असं बघून त्यांनी गावाचं नाव महाराष्ट्र ग्रामीण पतपुरवठा कार्यक्रमात घेतलं. आणि गटांना लाखांच्या घरातली मदत देऊ केली. ही बायकांच्या गटांची करामत बघून आता गावातल्या पुरुषांनी सुद्धा त्यांचे बचतगट सुरू केले आहेत.
गटानं आणली गावाला योजना
 मुख्य रस्त्याच्या आतल्या बाजूला असलेलं ससेवाडी. डोंगराच्या
५४.                 आम्ही बी घडलो।