पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/६५

हे पान प्रमाणित केलेले आहे.

नव्या दिशा
 स्वत:साठी कशीबशी २५ रुपये महिन्याला बचत करायची या कल्पनेपासून या व्यवहाराला सुरूवात झाली. उलाढाली वाढू लागल्या तसतसा विश्वास वाढू लागला. बचत गटाच्या बैठकीमुळे नुसत्याच पैशाच्या उलाढाली वाढल्या असं नाही तर एकूणच महिलांच विश्व मोठं झालं, मग मात्र या उपक्रमाला निश्चित अशी दिशा मिळाली. यातून महिलांच कर्तृत्व विविधांगांनी फुलेल असा प्रबोधिनीलाही विश्वास आला. स्वयंपूर्णतेकडे.. वाटचाल करताना अनुभवी गटांनी काही पुढच्या दिशा दाखवल्या.
महिला बचत गट : एक माध्यम
 बचत गटाच्या निमित्तानं महिला एकत्र जमतात आणि बचत गटाचे व्यवहार शिकता - शिकताच, त्या वेगवेगळे विषय हाताळायला शिकतात. बचत गटाच्या या निमित्ताने माहिती घेतात. स्वत:च्या, स्वत:च्या पोरांबाळांच्या, कुटुंबाच्या आरोग्याबद्दल. एरवी महिला स्वत:च्या तब्येतीच्या तक्रारी सांगत नाहीत. बायकांचा जन्मच सोसण्यासाठी असंच स्वत: महिला आणि आजूबाजूचेही म्हणत असतात. या गटांचे प्रमुख फक्त बचतीचंच काम बघत नाहीत, तर आरोग्य प्रकल्प गटातल्या प्रत्येक महिलेपर्यंत पोचवण्याची धडपड करतात. प्रबोधिनीच्या मदतीनं बचतीबरोबरच आरोग्याचेही धडे गिरवतात.
 इतर ठिकाणीही कधी बचत गट उद्योगासाठी, जमून मोठ्या भांडवलाच्या उलाढाली करतात, तर कधी पाणलोट विकासाच्या निमित्तानेजमणारे गट पाण्याच्या वापराच्या विषयी पाणलोट यांची माहिती देण्यासाठी गटाचा माध्यम म्हणून उपयोग केला जातो. या निमित्ताने महिला शक्ती जागृत होते व चांगल्या गोष्टीसाठी वापरली जाते आणि
तुम्ही बी घडाना ॥               ५९