पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१०

हे पान प्रमाणित केलेले आहे.



(७)

अनुमाने हा शास्त्राचा पाया असून तो आयुर्वेदात आहे व त्रिदोषांची उपपत्ति हीच ती तर्कशुद्ध अनुमानपरंपरा होय. आयुर्वेदाचे शास्त्रीयत्व ठरवितांना ही उपपत्ति किती तर्कशुद्ध आहे व किती व्यवहार्य आहे या एकाच मुद्यावर विचार करावयास पाहजे. त्रिदोषपद्धति तर्कशुद्ध ठरेल, ती व्यवहार्य ठरेल तर आयुर्वेदाचे शास्त्रीयत्वाला बाध येत नाही. मग आधुनिक पद्धतीच्या भाषेने तिचा विस्तार करणे, आधुनिक कालांत अवश्य अशा आयुर्वेदाच्या विविध अंगांचा विकास करणे हे अवश्य व इष्ट असून ते कार्य करणे कर्तव्य ठरेल. न्यूनता आणि अपूर्णता या दोन गोष्टी भिन्न आहेत. आयुर्वेदाचा कालयोग्य विकास करणे वेगळे आणि त्यांत नवीन तत्वें दाखल करणे वेगळे. आयुर्वेद औषधि चिकित्सेच्या दृष्टीने अपूर्ण नाही, ही गोष्ट त्रिदोषपद्धतीच्या सम्यक् ज्ञानाने निदर्शनास येईल. त्रिदोषांची कल्पना म्हणजे शरीराच्या जीवनव्यापाराची अगदी सुक्ष्म व तात्विक कल्पना इतकी गोष्ट पटल्यावर मग कोणत्याहि सुधारणांची भर त्यांत घातली तरी नुकसान होणार नाही. मात्र ही गोष्ट न पटल्यास किंवा त्रिदोषांची कल्पना असत्य ठरल्यास मग आयुर्वेदाचा शास्त्रीय अभिमान म्हणजे पोकळ शाब्दिक अभिमान ठरेल.
 आयुर्वेदांची मूळतत्वे अथवा त्रिदोष यांची शास्त्रीयता पटणे, आयुर्वेदाच्या सध्याचे परिस्थितीत अवश्य आहे त्याशिवाय सुधारणेचे मार्गात दिशाभूल होण्याचा संभव फार. आयुर्वेदाचा अभिमान बाळगावा, आयुर्वेदाचे शिक्षण घ्यावे आणि रोगनिदान, रोग चिकित्सा करतांना मूलभूत त्रिदोषांचा उपयोग अपूर्ण ठरावा त्यासाठी पाश्चात्य वैद्यकाची पुस्ती पाहिजे, मग आयुर्वेद राहिला कोठे? आयुर्वेदाच्या शिक्षणांत पाश्चात्य पद्धतींतील इंद्रियविज्ञानाची अवश्यकता भासल्यावर मग आयुर्वेदाचे शास्त्रीयत्व ते काय? व्यक्तींचा बहुश्रुतपणा हा गुण निराळा, पण आयुर्वेदीय शिक्षणक्रमांत इंग्रजी वैद्यकाचे मदतीशिवाय न भागेल तर मग आयुर्वेदाची पूर्णता कोठे राहिली ? इंग्रजी वैद्यक शिकून तयार झालेल्या डॉक्टरांनी आयुर्वेद किंवा इतर शास्त्रांचा परिचय करून घेतल्याने वाढलेल्या ज्ञानाचा चिकित्सेच्या यशस्वितेला उपयोग होईल. म्हणून इंग्रजी वैद्यकाचे शिक्षणक्रमांत आयुर्वेदाचा