पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८
आयुर्वेदांतील मूलतत्वे.


लक्षण आहे. कोणत्याहि वातजन्य विकारांत मलबद्धतेच्या लक्षणाच समावेश असावयाचाच. असें असतां वातविकारांत आणि मुख्य वातविकारांत ( वातविकाराणामपरिसंख्येयानामाविष्कृततमा व्याख्याताः असंख्यात वातविकारांपैकी हे ठळक असे ऐशीं सांगितले. च. सू. स्था. अ. २० ) या असंभाव्य लक्षणाचा समावेश कसा केला ? चरकाचे चक्रदत्तकृत व्याख्येमध्ये

वातजातीसारेपि विडभेदो वातजः ।


 ( वातजन्य अतीसारांतहि विडभेद वातजन्य असतो. ) असा या लक्षणाविषयीं खुलासा केला आहे. ( चरकसंहिता चक्रदत्त व्याख्यासंवलिता निर्णयसागर १९२२) हा खुलासा वाचून खुलासा तर होत नाहीच पण व्याख्याकारांचे आश्चर्य मात्र वाटतें. कारण अतीसारामध्ये प्रथमतः जठरांतील जलांशाची वाढ आणि अग्निमांद्य या गोष्टी गृहीत असतात.

संशम्यापां धातुरग्निं प्रवृद्धः ।

 (माधवनिदान अतीसार संप्राप्ति. ) आणि ह्या असल्या अवस्थेतील वायूचा संबंध अतीसाराचे वातिक पोटभेदामध्ये दाखवावयाचा असतो व त्याचा अर्थ जलांश वाढला खरा पण वातिक अवस्थेत म्हणजे यावरून कफ आणि पित्त यांहून वायूमुळे अतिसांरांतहि जलांश सापेक्षतया कमी असतो हें सुचविलें आहे. आणि 'वातातिसाराचे लक्षणांतहि' जुलाब थोडे थोडे - लहान लहान होतात. असा उल्लेख आहे.

अरुणं फेनिलं रूक्षमल्पमल्पं मुहुर्मुहुः ।
शकृदामं सरुकशब्दं मारुतेनातिसार्यते ॥ १ ॥
( माधवनिदान अतिसारनि.)

 यावरून वायूमध्ये मळात पातळपणा आणण्याचा गुण नसून मळात घट्टपणा आणणें हेंच वायूचे कार्य असल्याचे उघड होत आहे. असें, असतां ' या टीकाकारांनीं वातजातिसाराचा पुरावा घेऊन वायूमुळे मळ पातळ होणे या लक्षणाची सिद्धि करण्याचा उपक्रम केला आहे. सर्वच वाक्य लेख्नकाचा प्रमाद या सदरांत घालतां येत नाहीं. एक गोष्ट खरी कीं जर टीकाकारांनी अशा प्रकारचा खुलासा केला असला तरि वाताचे मुख्यच काय पण कोणत्याहि स्वरूपाचे लक्षणांत विडभेद हे लक्षण संभवनीय नाहीं. मग विड्भेद याचा अर्थ काय ? याचा अर्थ या लक्षणाचे मागील श्रोणिभेद यांतील शब्दसाम्यावरून लेखनाचे भरांत लेखकाचे हातून सहज घडलेला प्रमाद याहून दुसरा नाहीं. या जागीं विड्भेद अता शब्द नसून 'विड्ग्रह ' असा असावया