पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८९
ऐशीं वातविकार.



पाहिजे. वायूंची वाढ झाली, आंतड्यांत- पच्यमानाशयांत रूक्षता व शोषण वाढले, म्हणजे स्वाभाविकपणे मळाचें अधिक शोषण होऊन त्यांत अधिक घट्टपणा- कोरडेपणा येतो. याला मळाचे खडे होणें असें म्हणतात. असले खंड झाले की, त्यांचे उत्सर्जनही नीट होत नाही. २२ उदावर्त -- पकाशयांत वाढलेल्या वायूचा अव्यवस्थित इतरततः त्रासदायक संचार. वायु वाढला तर त्यानें गुदमार्गे निघून जावें पण वाढलेल्या वायूनें गुदमार्गालाहि रूक्षता येते व या मार्दवामुळे गुदमार्ग प्रसरण पावतो ती मृदुता कमी झाली कीं, या मार्गाचे आकुंचन होऊन वाढलेल्या वायूचें उत्सर्जन न होतां त्याला प्रतिलोम गति मिळून त्या वायूचा पक्काशयांत स्वैर संचार चालू होतो. २३ खजत्व म्हणजे एक पा य लंगडा होणे. पांगुल्यांतील विकृति एकाच पायापुरती होणें. ( विकृति एका, अनेक अगर सर्व शरीर भागावर होणें हें उत्पादक कारणे आणि शरीराच्या निरनिराळ्या अवयवांतील सामर्थ्य यांवर अवलंबून असतें. ) २४ कुब्जत्व कुबडेपणा पृष्टगत स्नायु व शिरा यांचे संकोचामुळे होणारा. २५ वामनत्व खुज्जेपणा हा विकार जन्मादारभ्य असावयाचा, एकाद माणूस फार उंच, ठेंगणा अथवा खुजा जन्माला येणें याला कारण वायु असला तरी तो गर्भातील दोष. वातविकारांत याचा समावेश कां असावा कळत नाहीं. २६ त्रिकग्रह- माकडहाड जखडणें. तेथील स्नायूंचे संकोचामुळे होणारें लक्षण. २७ पृष्ठग्रह पाठ जखडणें त्रिकगद्याप्रमाणेच पृष्ठाचे स्नायु संकोचामुळे हा विकार होतो. २८ पाश्वावर्मद-बरगड्या जखडल्या - आंवळल्या सारखे होणे. याचे कारण छातीचे भागांतील स्निग्ध पदार्थांचा आणि बरगड्यांत भरून असलेत्या मज्जाधातूचा क्षय होणें हें आहे. २९ उदरावेष्ट पोट जखडल्याप्रमाणे वाटणे. पोटाचे आंतील आंतडीं वृक्क इत्यादि अवयव व आशय यांवर मदोधरा कलेचे आच्छादन असतें आणि त्या कलेतील मृदुता व स्निग्धता यांमुळे पोटांतील अवयवांच्या हालचाली सुरळीत चालतात. यांतील मेद-चर्बी स्निग्ध आहाराचे अभावी कमी झाल्यानें कलेमध्ये रूक्षता येऊन हे लक्षण होईल किंवा आकस्मिक कारणाने नाभिस्थ शिरांचा संकोच झाल्यानंहि हैं लक्षण उत्पन्न होणारे आहे. मात्र पहिले दीर्घ काल राहणारे व दुसरें तात्कालिक इतकाच फरक. ३० हन्मोह - हृदयाचे चेतनमध्ये कमीपणा ३१ हृद्रव हृदयाचं स्पंदन ज्या स्नायूमुळे होतें त्यांचे शैथिल्य हृदयांत शैथिल्य आणते. व्यान वायूचे हृदयाचें संकोचन करण्याचे काम कमी होणे. ३२ वक्षउपरोध छाती भरून येणे. श्वासपथांतील अभिष्यंदामुळे श्वासाचा 'अवरोध. श्वासोच्छ्वास मोकळेपणानें न होतां अधिक वायूने फुफ्फुसें