पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
आयुर्वेदांतील मूलतत्वें.


भरल्यासारखीं वाटतात. ३३ वक्षउपरोध छातीला ओढ लागणे. फुफ्फुसांत रूक्षता व त्यामुळे संकोच होणे. ३४ बाहुशोष बाहूंचे संधीतील कफाची क्षीणता झाली म्हणजे यासंधींचे चलन सुखानें होत नाहीं ३५ ग्रीवास्तंभ मान ताठणे मानेचे स्नायु अभिष्यंद- सूज अथवा कोरडेपणा या कारणांनी ताठतात, संकोच पावतात, किंवा संवेदना कमी होते व मानेची हालचाल करीत नाहींत ३६ मन्यास्तंभ मानेच्या शिरा स्नायु ताठणे. कारण वरीलप्रमाणेच. फरक इतकाच की, मन्यास्तंभामध्ये मन्या ह्मणजे मानेच्या स्नायूचा स्तंभ होऊन त्यामुळे मस्तकाचे चलनांत व्यत्यय येतो. ३७ कंठोध्वंस. घसा खवखवणे. श्वासमार्गात कोरडेपणा उत्पन्न झाला असतां श्वासोच्छ्वासाच्या वायूचें घर्षण सहन होत नाहीं व घसा खवखवतो. हें खोकल्याचें पूर्वरूप आहे. ३८ हनुताड याचा नीटसा अर्थ कळत नाहीं. हे लक्षण ह्मणजे हनुस्तंभ असावा. हनुमूलाचे स्नायूंचा संकोच झाला असतां होणारे. ३९ ओष्ठभेद ओठ फुटणे. ओठांतील मृदुता कमी झाल्यानें ओंठ फाटतात. ४० दंतभेद, दांत फुटणें दांतामध्येहि भरून असणा-या मज्जा व रक्ताच्या क्षीणतेमुळे त्यांत रुक्षता येते. व दांतांचे कळपे ढलपे सुटतात. ४१ दंतशैथिल्य. दांत हालणे. दंतमांस किंवा हिरड्या यांतील स्नायूंचे शैथिल्यामुळे होणारा विकार. ४२ मूकत्व- मुकेपणा. शब्दवाहक स्रोतसांमध्ये वायूची विकृति स्रोतसांचा संकोच करणारी झाल्याने हैं लक्षण होते. ४३ वाक्संग शब्द अडखळणे. शब्दोच्चाराचे वेळीं कंठ आणि मुख यांतील स्नायूंची विशिष्ट हालचाल व्हावी लागते. या स्नायूंचा संकोच झाला असतां उत्पन्न झालेला शब्दहि बाहेर निघत नाही. ४४ कपायास्यता तोंड तुरट होणें. रसनेंद्रियांत एक प्रकारचा कांहींसा मधुर असा स्राव होत असतो. त्याचे अभावी तोंडाला तुरटपणा वाटतो. माधूर्याचें अविकृत कमीपणांत तुरट रसच शिल्लक राहतो. ४५ मुखशोप तोंडाला कोरड पडणें. वायूमुळे कोरडेपणा येतो, जलांश कमी होतो, व असलेल्याचा स्रावहि होत नाहीं. ४६ अरसज्ञता. रुचि न कळणे. जिभेवर टाकलेल्या पदार्थात जिभतील द्रवांचे मिश्रण होऊन त्याचे संयोगामुळे रसाचें रसनेंद्रियाला ज्ञान होते. तोंडाला कोरड पडली असतां तोंडांतील रसाचें मिश्रण पदार्थात होत नाहीं व त्यामुळे रसाचें ज्ञान होत नाहीं. ४७ अगंधज्ञता वास कोणता हे न कळणे. घ्राणेंद्रियामध्ये ज्यांना गंधज्ञान होते असे ज्ञानतंतु नासिकेचे अग्रभागी श्लेष्मल त्वचेमध्ये असून त्या भागांतील विशिष्ट आर्द्रतेनें या त्वचेतील सूक्ष्मरंध्रांत त्यांचीं टोर्के पसरलेली असतात व त्यांचे मार्फत वायूचे अणूंतून येणारा गंध त्यांना पोहोचतो. वायूची वाढ झाली म्हणजे नाकांतील त्वचेत