पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९१
ऐशीं वातविकार.

 कलेंत - कोरडेपणा येऊन तिचा संकोच होतो. ती संकुचित झाली असतां आंतील रंध्रे संकुचित होतात व गंधवाहक वायूचा गंधज्ञानत्रान् अशा ज्ञानतंतूपर्यंत प्रवेश होत नाहीं. गंधज्ञान नाहीसे होते. ४८ घ्राणनाश घ्राणेंद्रिय नाश पावणे वरीलसारख्या विकाराने घ्राणेंद्रियांतील ज्ञानवाहक तंतूची शक्ति नष्ट होते व त्यामुळे वास न येणें ही विकृति टिकाऊ होते. ४९ कर्णशूळ. कान ठणकर्णे कानांत कोरडेपणा आल्यामुळे. ५० अशब्दश्रवणं बहिरेपणा. नाकाच्या वास न येण्याचे अवस्थेशी ही विकृतिसारखी आंतील भागांमध्ये हवेच्या लहरी जाऊन आदळल्या पण अंतरिद्रियांतील सूक्ष्म च्छिद्रांमार्फत त्यांचा स्थानी आणि शब्दग्राहक वायूशी संयोग व्हावयास पाहिजे. रुक्षतेनें स्रोतोरोध झाला असतां कर्णकुहरांत प्रवेश झाला तरी शब्दाचा उपयोग इंद्रियस्थायी ज्ञानतंतूवर होत नाहीं. (इंद्रिय नाश स्वाभाविक सामर्थ्याचा नाश झाल्यानेंहि होतो. ५१उच्चैश्रुति फार मोठा आवाज ऐकू येणे. ( लहान शब्द अथवा आवाज ऐकू न येणें. ) कमी ऐकू येणें. ५२ बाघिर्य अगदी ऐकू न येणें सर्वच एका विकाराध्या वाढत्या स्वरूपाचे विकार. ( अशब्दश्रवण ) याचा अर्थ टीकाकार चक्रदत्तांनी नसलेला शब्द ऐकणे शब्दाभावेपि शब्दश्रवणं असा केला आहे. परंतु या अर्थात विशेष स्वारस्य दिसत नाहीं. असा अर्थ मानावयाचा तर अगंधज्ञता अरसज्ञता यांचाहि अर्थ अभावी ज्ञान असा करावा लागेल. ५३ वर्तस्तंभ पापण्या ताठणें. पापण्यांची आकुंचनशक्ति कभी होणें. ५४ वर्त्मसंकोच पापण्या संकुचित होणे. तेथील स्नायूंचे संकोचामुळे ५५ तिमिर अंधारी येणे डोळ्यांतील रूपज्ञान करणाऱ्या ज्ञानतंतूचें कार्य रुक्षतेमुळे न होणे. ५६ अक्षिशूळ डोळ्यांना ठणका लागणे. डोळ्यांतील रूक्षता-कोरडेपणा-यामुळे. ५७ अक्षिव्युदास डोळयांतील दानीनिका किंवा तारका विस्तारित होणें. ५८ भ्रूव्युदास भिवयां प्रसार पावणें. संकोचक स्नायूंचा स्तंभ झाल्याने ही लक्षणे होतात. ५९ शंखभेद शंखास्थि फुटल्यासारख्या दुखणे. ६० ललाटभेद् ललाटाला लागणे ६१ शिरोरुक, सर्व मस्तकाला ठणका लागणे हीं तीनहि लक्षणे त्या त्या भागांत रुक्षता वाढल्यामुळे होतात. ६२ केशभूमिस्फुटन केंसांची जागा-त्वचा फाटते. या त्वर्चेतील मार्दव कमी झाल्याने फाटते. ६३ अर्दित तोंड वंकडे होणें. हनुमूलाचे स्नायूंचा संकोच झाल्याने होणारें लक्षण. ६४ एकांगरोग. ६६ सर्वांगरोग. एकाद्या भागाच्या क्रिया कमी होणें किंवा सर्व शरीराचे चलनवलन व्यापार कमी होणे. वायूची ज्या भागांतील संवेदना आणि गति कमी होईल त्या भागांत होणारे विकार ६६ पक्षवध पक्षाघात. एका शरीर भागाचे वायूचे स्नायु क्रियाशून्य