पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२
आयुर्वेदांतील मूलतत्वे.

 होणे, ६७ आक्षेपक. आंचके. एकाद्या अवयवाचे स्नायु अनैसर्गिक व अव्यवस्थित रितीनें संकुचित होण्याने निरनिराळ्या प्रकारचे अंचिके येतात. ६८ दंडक. लांकडासारखा ताठणे. कारण सर्वांगीण स्नायूंचा स्तंभ. ६९ श्रम. थकवा वाटणें. वायूचा मुख्य गुण जो उत्साह त्याचा अभाव ७० भ्रम ज्ञानतंतूचा अशक्तपणा आला असतां होतो. ७१ वेपथु. कंप त्वचा किंवा स्पशेंद्रिय यांतील स्नायूंचा अव्यवस्थित संकोचविकास. ७२ जृंभा जांभया येणे. फुफ्फुसांतील वायूचे आधिक्याने त्याची श्वासमार्गांतून अधिक व प्रतिलोम प्रवृत्ति. ७३ विपाद. अप्रसन्नता उत्साहाचा अभाव दर्शविणारे लक्षण. ७४ अतिप्रलाप. बडबड शब्दवाहक स्रोतसांवर वायूचे वाढीमुळे अधिक उत्तेजनेचा परिणाम. ७५ ग्लानि. श्रमाची वाढती अवस्था. ७६ रौक्ष्य. रूक्षता. वायूचे वाढीचें सामान्य लक्षण. ७७ पारुप्य खरखरितपणा वाढत्या- कोरडेपणानें मृदुता नाहींशी होते. ७८ श्यावारुणावभासता त्वचेवर काळसर किंवा तांबून वर्ण दिसणें. वायूमुळे रक्ताचे क्षीणतेंत त्याचा त्वचेकडे कमी पुरवठा झाला की त्वचेमध्ये रक्ताची लाली योग्य प्रमाणांत दिसत नाहीं. ती कमी झाली की वास्तविक लालीहून कमी म्हणजे तांबूसपणा, किंवा त्याहूनहि कमी झाली की लालीचे अभावी काळसरपणा ही लक्षणें त्वचेतील रक्ताची क्षीणता दाखवितात. कचित् एकाद्य ठिकाणी अभिसरण कमी झाले आणि कांहीं काळपवितों रक्त एकाच जागी सांचलें म्हणजे त्याचे अधिक दाबानें कांहीं वेळ (सुजल्या जागी..) अधिक रक्तवर्ण व कांहीं काळानें तें रक्त नासूं लागल्यास त्यांत काळसरपणा दिसतो. ही रक्ताच्या दोन अवस्थेतील लक्षणे एकांगव्यापी आणि सर्वांगीण अशी होतात. ७९ अस्वप्न. झोप न येणें. ८० अनवस्थितत्व. आराम न वाटणें हीं दोनहि लक्षणे शरीरांत स्निग्धतेचा -हास झाला असतां ज्ञानतंतूंचा क्षोभ झाल्यामुळे होतात. याप्रमाणे ही ऐशीं वातलक्षणें होत.

________


या लक्षणांची तात्विकता.

 हीं वायूची सर्व लक्षणे ध्यानीं घेतां वायूचे स्वरूपाचा अथवा कार्याचा विशेष बोध होण्यासारखे एकादें तत्व त्यांत आहे असें वाटत नाही. यांत कांही लक्षणे इतकीं सामान्य स्वरूपाची आहेत की त्यांचा मुख्य म्हणून उल्लेख करण्याचे कारण नाहीं. ( पारुष्य, रौक्ष्य इ. ) आणि कांही तर तीव्र विकार आहेत. ( पक्षाघात, अर्दित इ. ) या सर्वांची एकत्र गोळाबेरीज कां केली कळत नाहीं. वायूमुळे उत्पन्न