पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९३
वातविकाराविषयीं विशेष.


होणाऱ्या लहान मोठ्या लक्षणांचा समावेशच करावयाचा, तर आणखीहि करतां येईल. मग ऐशी संख्याच मर्यादित कां असावी. " अशीतिर्वातिविकाराः चत्वारिंशत्पित्तविकाराः विंशतिः श्लेष्मविकारा: " वातविकार ऐशीं, पित्तविकार चाळीस, व कफविकार वीस, या विशिष्ट संख्येतच काय विशेष आहे ? विकारांची संख्या सांगत असतां कांहींतरि सामान्य तत्व स्वीकारून त्याचे अनुरोधानें लक्षणांची संख्या द्यावयास पाहिजे. वायूचे प्रकारांचा, त्याचे स्थानांचा अथवा गुणांचा असा कोणता तरी क्रम स्वीकारून त्यावरून लक्षणें किंवा विकारांचा उल्लेख करणे योग्य होते; परंतु तसा यांत कोणताच क्रम दिसत नाहीं. ही लक्षणे सर्वसामान्य व अनेक वातविकारांतील लहानमोठीं ऐशीं लक्षणे आहेत इतकाच अर्थ समजायचा.

___________
वातविकाराविषयीं विशेष.

वायूचे विकार अथवा लक्षणें यांमध्ये मुख्यत्वें दोन गोष्टींचा विचार करावा लागतो. एक वायूची स्थूलगति व दुसरी सूक्ष्म गति. यांचा स्पष्ट अर्थ ह्मणजे कर्मेंद्रियांतील गति व ज्ञानेंद्रियांतील गति असा होईल चालणें, बसणें, उठणें, बोलणें, उड्या मारणे, खाणेपिणें इत्यादि वायूच्या स्थूल क्रिया असून स्पर्श, गंध रस इत्यादि कार्यकारी त्या त्या भागाची सूक्ष्म हालचाल या दुसऱ्या सूक्ष्म हालचाली विशेषतः संवेदनामय असून पहिल्या प्रकारच्या स्थूल क्रियांनाहि उत्पादक जरि संवेदना असली तरी त्यांमध्ये नंतर गतीचे दृश्य स्वरूप अधिक व याकरितां या दोन क्रिया करणान्या वायूच्या दोन विभागांना एक गतिमय आणि दुसरा संवेदनामय किंवा गतिविशिष्ट आणि ज्ञानविशिष्ट अशी नांवें व्यावहारिक सोईसाठी योजावयास हरकत नाहीं. असे केल्यानें वातविकारांमध्ये वर्गीकरण करून गतीचे विकृतीमुळे होणारे व संवेदनेचे विकृतीमुळे होणारे असे वातविकारांचे दोन ठळक पोटभेद करतां येतील. अर्दित, आक्षेपक, हनुस्तंभ, दंडक, वाक्संग इत्यादि विकार वायूचे गतिविशिष्ट विभागांत येतात. व बाधिर्य, अरसज्ञता, स्पर्श न होणें, पादसुप्तता, इत्यादि संवेदना विशिष्ट विभागांत येतात. अशाप्रकारचें एक वर्गीकरण केल्यावर पुन्हां वातविकारांचा सष्ट बोध होण्यासाठी म्हणून आणखी वातविकारांचे दोन भेद मानावे लागतात. हे भेद हाणजे, वायूचा कोप त्याची वाढ होऊन झाला आहे कीं, वायूची वाढ झाली नसतांहि त्याचे संचारांत इतर पदार्थांचे वाढीने व्यत्यय आला आहे