पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

 यांचे निदर्शक होत. पहिल्या प्रकारचे विकारांना केवळ वातजन्य आणि दुसन्या प्रकारचे विकारांना संसृष्ट्र वातजन्य अशीं नांवें देतां येतील. म्हणजे कोणत्याहि प्रकारच्या वातविकारांचा विचार करतांना प्रथम या गोष्टीचा विचार करावयास पाहिजे.

_________


बहुतेक वातविकार संसर्गजन्य असतात

.

 शुद्ध वायूचे विकारांपेक्षां संसृष्ट वायूचे विकारच अधिक आणि अधिक त्रासदायक होतात. कारण कोणत्याहि रोगाला उत्पादक दोषाचा कोप किंवा उन्मार्गवस्था अवश्य असते. वायूला ज्यावेळी उन्मार्गावस्था यावयाची त्यावेळी त्याचे मार्गांत कोणत्या तरी पदार्थाचा प्रतिबंध व्हावयास पाहिजे. वायूचे विकार अनेक सांगितले आहेत. तथापि वायूचे मुख्य व सर्व प्रकारचे विकारांमध्ये नियमाने असणारे लक्षण म्हणजे शूल किंवा ठणका हैं होय. 'शूलं नतेऽनिलात्, वायूशिवाय शूल नाहीं. ठणका कां लागतो ? कोणत्यातरी शरिराचे भागांत अभिसरण कमी झाले, सूज आली, जखम झाली इत्यादि कारणाने जर एकाद्या पदार्थाचा संचय झाला तर तो पदार्थ अधिक प्रमाणांत ज्या स्रोतसांत भरेल, तेथील वायूचे - हवेचे संचाराला मार्ग रहात नाहीं. व सुख संचाराऐवजी संचित पदार्थीकडून दबला जाणारा वायूहि उलट जाण्याचे आवेगानें प्रतिलोम होतो. पण या त्याच्या प्रतिक्रियेच्या प्रयत्नांत स्थानी स्रोतसांवर अधिक दाब व ताण पडून तीं ठणकतात. या दृष्टीने सर्व शूलांचें कारण वायू सांगितले आहे.
 अशा प्रकारचा प्रतिबंध कोठें प्रवाही रक्त वगैरे पदार्थांचे संचयाने, कोठें घन अशा मांसाचे सुजेमुळें, तर कोठें विरळवायूचे पक्वाशय वगैरेंतून उत्सर्जन न झाल्याने त्याचीच जी वाढ होते तीमुळे म्हणजे वायूमुळेच होऊ शकतो. परंतु कोणत्याहि प्रकारचें कारण असले तरी त्याचें शूलस्वरूपी कार्य व्हावयाचे तर शरीरावयवावर वर सांगितल्याप्रकारचा परिणाम झालाच पाहिजे. आणि यामुळे आरंभी सांगितलेल्या विकाराप्रमाणे वातविकारांनाहि त्याची उन्मार्गगामिता अपरिहार्य आहे. केवळ वायूची वाढ झाली तर त्याचे क्रियांमध्ये वाढ होईल. पण रोग होत नाहीं. केवळ रूक्षता वाढली, खरखरतिपणा आला, याला वायूचे वृद्धीचे लक्षण इतकेंच म्हणतां येईल; तो रोग नव्हे. या वाढीचे अवस्थेत कोणत्याही प्रकारचा रोग उद्भवण्याचा संभव असतो. पोटांत-पक्वाशयांत वायु वाढला पण जर गुदमार्गानं त्याचे उत्सर्जन होत आहे तर पोट फुगणे, दुखणे, गुरगुरणे, किंवा गुल्म इत्यादि विकार होत नाहींत. ती फक्त वाढ असते. व याच वाढीचा परिणाम गुदद्वारांत रूक्षता