पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/११०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो.टिळक ग्रंथसंग्रहालय, वाई
९७
आवृत किंवा प्रतिबंध पावलेल्या वायूचीं लक्षणें.



रक्तावृत वायु-लक्षणेः- त्वचा व मांस यांमध्ये दाह आणि ठणका, सूज, सुजेवर लाली आणि गांधी उठणें.
मांसावृत वायु-लक्षणेः- घट्ट सूज, पुळ्या येणें आणि मुंग्या आल्यासारखे वाटणे.
मेदानें आवृत वायूची लक्षणेः-- मृदु, स्निग्ध, सरकणारी, अशी सूज येणें अरुचि . याला ओढयवात म्हणतात.
. ६ अस्थ्यावृत वायु-लक्षणेः- सर्वांग सुया टोचल्याप्रमाणे दुखणे आणि गात्रे शिथिल होणें. दाबून घेण्याची व अति उष्ण स्पर्शाची इच्छा.
मज्जावृत वापु - लक्षणे:- वाकणे, (हाडें) जांभया येणे, गुंडाळल्याप्रमाणे वाटणे, आणि दावल्याने आराम वाटणें.
शुक्रावृत वायु-लक्षणेः-शुक्राचा वेग फार (कामुकता) अथवा वेग अगदी नसणें किंवा शुक्राचे उत्सर्जन नसणे.
अन्नावृत वायु-लक्षणेः-- जेवल्यावर पोटाला रग लागणे-दुखणे, अन्न पचल्यावर आराम वाटणें.
१० मूत्रावृत वायु- लक्षणें: -- लघवी न होणे, मूत्राशय फुगणे.
११ विडावृत-पुरीषावृत वायु-लक्षणेः--अधोभागांतील मळांचें उत्सर्जन न होणें गुदद्वारांत कापल्याप्रमाणे वायु सरकतांना दुखणें, जेवल्यावर पोट फुगणं, अन्नाचे भारामुळेच मलोत्सर्जन होतें. मळ कोरडा असून मोठ्या कष्टानें आणि वेळाने पडतो.
 सर्वधात्ववृत (सर्व धातूंमध्ये कुपित झालेला ) वायु-लक्षणें--कमर, पाठ व ओटीपोट यांत वेदना. वायूची प्रतिलोमता आणि हृदयांत वेदना होणे व अस्वस्थता येणें.
१३पित्त आणि कफ व वायु यांचा संसर्ग - पित्तावृतप्राणवायु लक्षणे भ्रम, मूर्च्छा, दाह आणि अन्नाचे पच्यमान अवस्थेत वांति होणे. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या वेदना.
१४ पित्तावृत उदानवायु-लक्षणः -- भ्रम वगैरे वरील लक्षणे शिवाय अंतर्दाह आणि उत्साहनाश-ग्लानि.
१५ पितावृत उदानवायु-लक्षणः - सर्वांगाचा दाह, ग्लानि, निरुसाह, वेदना.
१६ पित्तावृतसमान वायु-लक्षणें. पाचक अग्नीचें मांद्य, घाम फार येणे. अस्वस्थता आणि तहान लागणे.
१७ पित्तावृत अपान वायु-लक्षणे - अपानमार्गांत दाह, मळावर पिंवळेपणा येणे. मूत्रमार्ग आणि मलमार्ग यांमध्ये दाह आणि वेदना.
१८ कफावृत प्राणवायु-लक्षणें:-सुस्ति, झांपड, अरुचि, वांति, थुंकणे, शिका येणे, ढेंकरा, श्वासोच्छ्वास यांचा अवरोध.
५: