पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८
आयुर्वेदांतील मूलतत्वें.


१९ कफावृत उदानवायु-लक्षणे - अंग जड होणें. अरुचि, वाणी व वर अडखळणें - अडकणे, बल आणि कांति-वर्ण-नाश पावणे.
२० कफावृत व्यानवायु - लक्षणें - सांधे धरणे, हाडें फुटणें, शब्द अडणें, सर्वांग जड होणें चालतांना अडखळणे.
२१ कफावृत समानवायु-लक्षणें अंग गार होणें, घाम न येणें. व अग्निमांद्य

२२ कफावृत अपानवायु-लक्षणे मूत्र व मळ यांचें कफयुक्त उत्सर्जन

( येणेप्रमाणे हे बावीस प्रकार होत. ).


 याशिवाय आणखी वायूचे पोटभेदांमध्यें परस्पर आवरणाची लक्षणेहि दिली आहेत.
 ह्या सर्व लक्षणांचा विचार करतां स्पष्टपणे निदर्शनास येणारी गोष्ट ही की, वायूचें रोगकर्तृत्व हे त्याचे स्वतंत्र वाढीने होत असले तरी अनावृत किंवा अनिरुद्ध अवस्थेत वायूचे विकार संभवत नाहींत. कोणताहि वातविकार असो, त्यामध्ये वायूचे मार्गात संचारांत कशामुळे तरी व्यत्यय हा आलेला असलाच पाहिजे. त्याशिवाय वातविकारांचा संभव नाहीं. याचे स्पष्टीकरणासाठीं वातविकारांची कांहीं उदाहरण घेऊ.
 वायूचे प्रसिद्ध विकारांमध्ये पक्षाघात किंवा अर्धांगवायु प्रसिद्ध आहे. हा विकार वायूने होतो ह्मणजे काय होतें ? पक्षाघाताची संप्राप्ति आयुवेदीय ग्रंथांत दिली आहे ती अशी:-

गृहीत्वाSर्धे तनोर्वायुः शिराः स्नायूपूर्विशेोष्य च ।
पक्षमन्यतरं हंति संधिवंधान विमोक्षयन् ॥ १ ॥
अष्टांगहृदय, माधवनिदान.
गृहीत्वा वा शरीरार्ध शिराः स्नायूर्विशोप्य च ॥

चरकसंहिता.

अधोगमाः सतिर्यग्गा धमनीरूर्ध्वदेहगाः ।
यदा प्रकुपितोऽत्यर्थं मातरिश्वा प्रपद्यते ॥१ ॥
तदन्यतरपक्षस्य संधिबंधान् विमोक्षयन् ।
हंति पक्षं तमाहुर्हि पक्षाघातं भिपग्वर: ॥ २ ॥

सुश्रुत संहिता.


 या संप्राप्तीमध्ये कुपित झालेला वायु शरीराचे एका भागांतील शिरा व धमनी आणि स्नायु यांचे शोषण करतो व त्यामुळे पक्षाघात होतो, असा अभिप्राय आहे. कोणत्याही भागांतील अभिसरण आणि संवेदना यांचा नाश झाला ह्मणजे तो भाग निरुपयोगी - नष्ट - समजावयाचा. शिरांचे शोषणाने अभिसरण व स्नायुंचे शोषणाने संवेदना व गति यांचा नाश होतो आणि त्यामुळे शरिराचा अर्धा भाग क्रियाशून्य - मृतप्राय होतो, म्हणूनच त्याला पक्षवतध असेंहि नांव योजले आहे. या विकारांत