पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/११२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९९
आवृत किंवा प्रतिबंध पावलेल्या वायूचीं लक्षणें.

 वायु वाढलेला असून त्यामुळे शोषण झालेलें असतें हें खरें असले तरी ज्यावेळी शरीरार्ध क्रियाशून्य होतें त्यावेळी वायूचे संचाराला शोषणामुळे स्रोतःसंकोच हेंच कारण असतें. असें झालें नाहीं तोंपर्यंत वायु वाढलेल्या भागांत रूक्षता, लाघव, पारुष्य इत्यादि वातगुणांचें आधिक्य होईल. पण त्यामुळे,

कृत्स्नोऽर्धकायस्तस्य स्यादकर्मण्यो विचेतनः ॥

मा. नि.अ.हृ. च. सु.

 “त्या रोग्याचें सर्व शरीरार्ध क्रियाशून्य इतकेंच नाहीं तर चेतनाशून्य होते. " अशी स्थिति येण्याचे कारण नाहीं. धातुक्षय-रक्तक्षय झाला असतां अशा प्रकारचा वातप्रकोप होतो किंवा धातुक्षय नाहीं इतकेंच नव्हे तर केवळ वायूची वाढहि झालेली नाहीं अशा स्थितीमध्ये वायुचे मार्गरोधामुळेच पक्षाघात होऊं शकतो. पक्षाघाताचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक वायु वाढल्यामुळे होणारा व दुसरा वायु न वाढतां त्याचे संचांरांत व्यत्यय आल्याकारणाने होणारा. पहिल्याला केवळ वातजनित आणि दुसन्याला संवृतवातजनित अशी नांवें आहेत. दुसऱ्या प्रकारामध्ये कफमिश्र वायू अर्थात् कफानें मार्गसंरोध होऊन कुपित झालेल्या वायूने होणाऱ्या पक्षाघातांत, शीतता, गुरुत्व व सूज हीं लक्षणे असल्याचा उल्लेख आहे. आणि ही लक्षणे वायूचे वाढीची तर नाहींतच पण ज्या वेळी या लक्षणांची वाढ झालेली दिसून येते त्यावेळीं त्यांचे विरुद्ध गुणाचे वायुचा कांहीं अंशी क्षयच असतो. वाढीचे अवस्थेत दोन प्रकार. एक वायूची वातकारक पदार्थांनी वाढ होऊन त्याचे शोषणात्मक कार्य सुरू होणें व दुसरा प्रकार म्हणजे आकस्मिक जखम वगैरे कारणांनी धातुक्षय-रक्तक्षय- होऊन वायु वाढणे. पहिल्याहून दुसरा प्रकार अधिक परिणामकारक व यासाठीच वातजन्य पक्षघात कष्टसाध्य व धातुक्षयजन्य तर असाध्यच असा त्याचा उल्लेख केला आहे आणि संसर्गजन्य साध्य असल्याचे सांगितलें आहे. कारण त्यामध्ये झालेला मार्गावरोध दूर झाला की शरीरव्यापार पुनश्च सुरळीत चालतात. जोपर्यंत अभिसरण व चेतना-संवेदना आहे तोंपर्यंत सुधारणोपायांचा उपयोग व्हावयाचा.
 या पक्षाघाताचे उदाहरणावरून ध्यानांत येईल की, शुद्ध वात- विकारांत क्रियाशून्यता येते. क्रियाशून्यतेचे विकार कमी अभिसरण व संवेदना यांचा अभाव ज्यांत असले विकार निदानशास्त्रांत 'असाध्य' म्हणून शेरा मारण्याला योग्य बहुतेक वातविकार मार्गरोधामुळे होणारे म्हणून उल्लेख, यासाठीच केला आहे. होणारा मार्ग रोध वायु वाढला असतां झाला आहे कीं न वाढतां झाला आहे