पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/११३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१००
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

 इतकाच विचार यांत करावयाचा असतो. वायु न वाढतां दुसऱ्या पदार्थांचे वाढीनें त्याचे क्रियांत व्यत्यय आल्यामुळे विकाराला वात- विकार नांव देण्यांत येते. मेदोवृद्धीमध्ये उवड उघड वायूचे विरुद्ध गुणाचा मेद वाढून वायूच्या क्रिया कभी झाल्या असतां या विकाराला वातक्रियांचे वैषम्य सुचविण्यासाठी आढ्यवात हें नांव दिलें आहे. केवळ वाढ किंवा केवळ -हास म्हणजे वैषम्य अगर रोग नव्हे. अस्थानीं अयोग्य प्रमाणांत झालेली वृद्धि क्षय म्हणजे वैषम्य किंवा रोग हैं यावरून उघड होत आहे. वातविकारांमध्ये वायु वाढला तरी त्याला अवरोध झाल्याशिवाय विकार होत नाहीं याचे उदाहरण वात रक्त या विकारांत स्पष्ट आहे.

वातरक्त.

 वातरक्त हा विकार वात आणि रक्त यांचे विकृतीमुळे झालेला असतो व म्हणूनच वातरक्त हैं नांवही योजलें आहे, ह्मणजे या विकारांत रक्त आणि वायु यांची विकृति एक काली व एक रोग उत्पन्न करणारी असते आणि यावरूनच या विकारांत रक्त वाढलेलें असत नाहीं हें उघड असते. वातरक्त हा एक संधिवाताचा प्रकार आहे. यांत सूज असते पण ही सूज वाढलेल्या व वाढून दूषित झालेल्या रक्तामुळे आलेली नसून क्षीणावस्थेत दूषित झालेल्या रक्तामुळे आलेली असते. विशेषतः अधोभागी सूज येणे. संधींतच सूज येणें आणि रक्ताचे विदाहावस्थेमुळे स्पर्श सहन न होणें हीं लक्षणे रक्तवृद्धीचीं नाहींत. वायु आणि रक्त एकसमयावच्छेदाने वाढणारी नाहींत, कारण तीं परस्पर विरुद्ध आहेत.
 व संप्राप्तीमध्ये 'ततसंपृक्तं वायुना दूषितेन तत्प्राबल्यादुच्यते वातरक्तं ' ( दूषित वायूने संयुक्त आणि वायूचे प्राबल्य असतें, यासाठी याला वातरक्त नांव आहे ) असा खुलासा केलेला आहे. चरकांत वातरक्ताविषयीं वायूची वाढ स्पष्टच सांगितली आहे.
 वायुविवृद्धो वृद्धेन रक्तेनावारितःपथि ॥ (च० सं० वि स्त्रा. अ२९ वाढलेला वायु वृद्धरक्तानें अवरुद्ध झाला असतां वातरक्त उत्पन्न करतो ! यांत रक्तवृद्ध असा उल्लेख केला आहे, तथापि रक्ताची वाढ सर्व शरिरांतील नाहीं. कारण कारणे सांगितलीं आहेत तीं रक्ताचे वाढीचीं नाहींत.

कषायकटुतिक्ताल्परूक्षाहादारादभाजनोत् ॥

 तुरट, कडु, तिखट असला आहार, कमी आहार किंवा अनाहार ही कारणें रक्त वाढविणारीं नाहींत त्यांनीं वायुची वाढ होते. अशा