पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/११४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०१
वातरक्त.



अवस्थेत प्रवास वगैरे कारणांनी खालच्या पाय वगैरे भागांत किंवा संधीत संचित झालेलें रक्त कमीपणामुळे त्याच जागी राहतें. त्याचें अभिसरण होत नाहीं, व त्या भागांत वायुचे संचाराला अवरोध होऊन सूज येते. रक्त दूषित होते, या वर्णनावरून वातरक्तांत वृद्धि वायूची व प्रमाणस्थित किंवा कमी झालेल्या रक्ताची सूज असा हा विकार असतो. यामुळेच धमनी व अंगुलीसंधींचा संकोच होतो.

धमन्यमुलिसंधीनां संकोचोंगग्रहोऽतिरुकृ. ॥

 त्याचप्रमाणं सुर्जेत वाढ नसणे हैं लक्षण असतें.

शोथस्य रौक्ष्यकृष्णत्वश्यावतावृद्धिहानयः ॥

 या विकाराचे असाध्य लक्षणांत अंगुलीवक्रता-बोटें वांकड होणें - हैं एक आहे. स्नायूंचा संकोच व धमनींची शुष्कता या लक्षणाने दाखविली आहे. वातरक्त हा वातविकार असल्या प्रकारचा म्हणजे वृद्धवाताने झालेला असला तथापि त्यांतहि अवरोध पाहिजे (रक्तेनावारितः पथि । ) हैं यांत उघड आहे. मात्र ज्या रक्तामुळे आवरण किंवा अवरोध झाला ते वाढलेलें नाहीं इतकाच फरक व या कारणानं या विकारावरील उपचारांमध्ये बृंहणाचे धोरण स्वीकारले पाहिजे. सर्व उपचार याच धोरणाने सांगितले आहेत. घृर्ते व सिद्धक्षीर यांचाच विशेष उपयोग सांगीतला आहे.
 वातरक्तामध्ये कांहीं ठिकाणी रक्त वृद्ध असल्याचा निर्देश आहे व त्यावरून या विकारांत रक्त वाढलेलें असतें अशी समजूत आपाततः होण्याचा संभव आहे. तथापि वायूची वाढ असतां रक्ताची वाढ होणें संभवनीय नाहीं. ज्यावेळी रक्त वाढेल त्यावेळीं वायु क्षीणच व्हावयास पाहिजे ही गोष्ट अगदीं सिद्ध आहे. व रक्त वाढलेलें आणि वायु क्षीण असें असतां मग या विकारांत वायूचा संबंधच कां असावा ? परंतु वातरक्तामध्यें आधीं वायूचा उल्लेख केला आहे त्यावरून हे उघड होत आहे की वायूची वृद्धि या विकारांत मुख्य आहे. व एकाद्या संधी वगैरे ठिकाणीं रक्तसंचय अर्थात् रक्ताची वाढ व त्यामुळे संचाराला अडथळा असा याचा उघड निष्कर्ष आहे. यांत सांचून बिघडलेलें रक्त काढून टाकण्यास सांगितलें आहे. त्याचा उद्देश संचाराचे अभावी जे रक्त नासले त्याचे उत्सर्जन इतकाच आहे.
 वायूची वृद्धि नाहीं किंबहुना क्षीणता असतां होणारा याच जातीचा म्हणजे सांधे दुखणे, सुजणें या स्वरूपाचा संधिवाताचेच जातीचा दुसरा विकार सांगितला आहे. परंतु त्यांत वायूची विकृति अली तरी प्राधान्य नाहीं असें असल्याने त्याला अशा अर्थाचे सूचक नांव दिलें आहे, अशा प्रकारचा विकार.