पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/११५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२
आर्युवेदांतील मूलतत्वें.


आमवात.

हा होय. या विकारांत कफकारक अशा आहाराचारांमुळे अन्नरस व परंपरेनें रसरक्तधातुहि कफदूषित होतात व यालाच आम हें नांव दिले आहे. असला आम रसधातु सर्व शरीरांत पसरतो. असला रसधातु घन व पिच्छिल-बुलबुळीत झालेला असतो. व असल्या घन रसधातूनें सर्व धमनी आणि इतर शरीरभाग स्नायु-पेशी - यांमध्यें अभिष्यंद उत्पन्न होतो, सूज येते व स्नायूंचे क्रियेमध्ये व्यत्यय येऊन सर्वांगाला विशेषतः संधींमध्ये शूल होतो. या विकारांत सर्व शरीरांत अभिष्यंद झालेला असतो. अर्थात् वाढ आमाची-कफाची आणि क्रिया वैषम्य व शूल हैं मुख्य लक्षण वायूचे यामुळे उत्पादक आमाचा खुलासा होण्यासाठी नांव आमवात असे दिले आहे. याची उत्पादक कारणें व संप्राप्ति आयुर्वेदांत दिली आहे ती -

 कारणे :- " विरुद्धाहारचेष्टस्य मंदाग्नेर्निश्चलस्य च ॥
  संप्राप्तिः - " तेनात्यर्थं विदग्धोऽसौ धमनीः प्रतिपद्यते ॥

वातपित्तकफैर्भूयो दूषितः सोन्नजो रसः ॥
स्रोतांस्यभिष्यंदयति नानावणौऽतिपिच्छिलः ।। १५ ।।


  यामध्ये श्लेष्मल कारणे आणि त्यांचा सर्व शरीरव्यापी अभिष्यंद ही अवस्था आमवात निर्माण करते. वायु मुख्य नाहीं आमानें वायूचा अवरोध हेंच विकारोत्पादक कारण आहे. वातरक्तामध्ये रक्ताची वृद्धि कारण नाहीं वृद्ध वायु असतो वाढलेल्या वायूचा अवरोध असल्यानें त्यांत संकोच असतो आणि आमवातांत वायूची वाढ नाहीं तर आमजन्य अभिष्यंद. वातरक्तांत संकोच आणि शुष्कता है पर्यवसान तर आमवातांत अभिष्यंद सूज, शीतता स्तब्धता हैं पर्यवसान. यामुळे हे दोनहि विकार वायूचे. दोहोंतहि वातसंचाराचा व्यत्यय असतो पण एकांत वायु वाढलेला आणि दुसऱ्यांत नाहीं असा दोन विकारांत स्पष्ट फरक आहे. व हा अशा प्रकारचा फरक विचारांत घेणे हेंच वातविकारांत महत्वाचे असते.

ऊरुस्तंभ.

 हा विकारहि आमवाताप्रमाणेंच होणारा. फक्त यांतील विकृति मांड्यांतच मर्यादित असते. हा विकारहि वायूचा. मांड्यांची हालचाल सुरळीत होत नाहीं पण कारण कफ. यावर उपचार कफनाशक. वायूचा विकार या शंकेने कदाचित् वातनाशक स्नेहन वगैरे केल्यास फायदा न होतां विकार वाढावयाचा.