पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/११६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०३
वायूच्या उत्सर्जक गुणांचें महत्व.



" वातशकिभिरज्ञानात्तस्य स्यात् स्नेहनात्पुनः ॥
पादयोः सदनं सुप्तिः कृच्छ्रादुद्धरणं तथा ॥ १॥

 अज्ञानानें वायु समजून 'वातस्योपक्रमः स्नेहः ' या सामान्य नियमाअन्वये स्नेहन (तेल चोळणे इत्यादि) केल्यास त्यानें पायांत स्तब्धता येते व उचलतां येत नाहींत. अशा प्रकारे वायूचे विनाशक उपाय या विकारांत दुष्परिणामी होत असल्याचे सांगितलें आहे या विकारांचे उदाहरणांवरून वायूचे विकार आवरणाशिवाय-अवरोधाशिवाय होत नाहींत ही गोष्ट ध्यानीं येईल. व यामध्ये दोन प्रकार कसे संभवतात याचा उलगडा होईल.

वायूच्या उत्सर्जक गुणाचे महत्व.

 वायु हा तत्वतः वाढून त्याला प्रतिबंध झाल्याने किंवा तो कमीच होऊन त्यामुळे, कोणत्याहि कारणानें कां होईना पण जर शरीरांतील कोणत्याहि भागांत वायूचे उत्सर्जन करण्याचे कार्य न होईल तर प्रत्येक ठिकाणी विकार होईल. पक्वाशयांतील वायु कमी झाला अगर वाढून गुदमार्गातील मृदुता कमी होऊन त्याचे संकोचामुळे मळाचे उत्सर्जन झाले नाही तरी मळाचे उत्सर्जनाभावी विकार होणारच. वाढ झाली असतां प्रतिलोम वायूमुळे वेदना फार व त्यामुळे रोगसंभव अधिक. त्रास फार पण अनुलोमन सुखसाध्य तत्वतः वायु कमीच झाला तर वेदना कमी रोगोद्भव उशीराने पण व्याधिनाशही उशीराने आणि कष्टानें. एकूण उत्सर्जनक्रियेचे न्यूनतेमुळेच कमी अधिक प्रमाणांत वातविकारांचा संभव, यामुळे वातविकारांचें सामान्य स्वरूप म्हणजे वायूचा गतिविघात होय असेंच ठरते. वायूचा रूक्ष गुण वाढला व त्यामुळे रूक्षता अथवा स्रोतसांमध्ये शुष्कता आली तर निरनिराळ्या आशयांत व्हावयाचा अनेक उपयुक्त रसांचा स्राव होत नाहीं, अप्रत्यक्षपणे हा गतिनिरोधच होय. 'अव्याहतगतिः' वायु पाहिजे ह्मणजे पूर्ण शंभर वर्षे वांचतो हे सांगण्यांतील हेतु असाच आहे. शरीराला वायूच्या उत्सर्जक गुणाचे फार महत्व आहे. व तें कमी होणें म्हणजेच वातविकार. मग हें उत्सर्जन अभिष्यंद होऊन होवो, पित्ताच्या फाजील उष्णतेचा स्पर्श सहन न झाल्याने एकाद्या भागांतील ज्ञानतंतु व त्याचे अनुरोधानें स्नायु यांचा आकस्मिक संकोच झाल्यामुळे होवो, रूक्षता वाढून स्रोतसांत शुष्कता येऊन होवो किंवा ज्ञानतंतूंच्या शक्तिक्षीणतेने स्वाभाविक उत्तेजनाची कमतरता झाल्यानें होवो, या गोष्टीचा विचार चिकित्सा करतांना करणे जरूर असले तरी 'उत्सर्जनात व्यत्यय म्हणजे वातविकार, हें सामान्य तत्व अबाधित राहाते. ज्याप्रमाणे कफाचे संयोजन व पित्ताचें विभाजन हीं काय शरीरस्थितीला अत्यवश्यक