पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/११७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४
आयुर्वेदांतील मूलतत्वें.


त्याचप्रमाणें हें वायूचे उत्सर्जनकार्यहि तितकेंच अवश्यक आहे. व या दृष्टीनेच वायूची योजना मुख्य तत्वांत केली आहे. संयोजक अणु म्हणजे कफ किंवा श्लेष्मा, विभाजक किंवा पाचक अणु म्हणजे पित्त या व्यावहारिक भाषेप्रमाणे वायूला उत्सर्जक अणु हें नांव देतां येईल. याप्रमाणे श्लेष्मा, पित्त आणि वायु हे आयुर्वेदांतील त्रिदोष आहेत.

संसर्ग आणि सन्निपात.

 आयुर्वेदामध्ये ज्याप्रमाणे या तीन दोषांचीं स्वतंत्र कार्ये सांगितलीं आहेत त्याचप्रमाणें त्यांत मिश्र स्थितींतील विकारहि सांगितले आहेत.

संसर्गः संन्निपातश्च तद्वित्रिक्षयकोपतः ॥

अष्टांगहृदय.

 त्या दोन दोषांच्या क्षयाला किंवा कोपाला आणि तीनहि दोषांच्या क्षयाला किंवा कोपाला अनुक्रमे संसर्ग आणि सन्निपात हीं नांवें आहेत अशी सामान्य व्याख्या दिली आहे. आणि सामान्य संसर्गाचे ठळक प्रकार तीन व संनिपाताचे प्रकार तेरा सांगितले आहेत.

संसर्गस्त्रिधा तत्र तु तान्नव ।
त्रयोदश समस्तेषु ॥

अष्टांगहृदय.

 या प्रकारांच्या स्पष्टीकरणापूर्वी संसर्ग व संनिगत यांत्रिपर्थी थोडा अधिक खुलासा करावयास पाहिजे.

संसर्ग म्हणजे काय ?

 दोन दोषांची मिश्र विकृति. अशी विकृति होईल काय ? कफ व पित्त यांची एकाच वेळी वृद्धि होईल काय ? कफ शीत व पित्त उष्ण अर्थात् हे पूर्णपर्णे परस्परविरोधि दोष. यांच मिश्रण होणार कसें? पित्त तीक्ष्ण कफ त्याविरुद्ध मंद त्याचप्रमाणे वायु रूक्ष कफ स्निग्ध वायु चंचल तर कफ स्थिर अशांची एकत्र एकदम वाढ अथवा मिश्रण कसे व्हावे ? व असें असतां संसर्ग संभवनीय कसा ? असा प्रश्न स्वाभाविकपणेंच उत्पन्न होतो. याचे उत्तर काय ? याचे उत्तर असें आहे कीं, ही मिश्रणे दोषांच्या स्थूल स्वरूपाची नसून सूक्ष्म क्रियांचीं सांगितली आहेत. तीन दोषांच्या क्रिया हणजे अनुक्रमे संघटन, पचन आणि विसर्जन किंवा विसर्ग, आदान व विक्षेप. या क्रियांपैकी एका क्रियेची विकृति एक दोषी दोन क्रियांची विकृति संसर्ग किंवा द्विदोषि आणि तीन क्रियांची त्रिदोष किंवा संनिपात ही कशी होते. एकाद्या ठिकाणी विसर्ग किंवा घटन अधिक झाले याला एकदोषी कफाची वृद्धि